मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर - खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार अंतर्गत पुलक मंच परिवार तर्फे पर्युषण महापर्व व नवरात्री महोत्सवाचे औचित्य साधुन महाआरती व नृत्य प्रतियोगीतेचे आयोजन दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता हिराचंद कासलीवाल प्रांगण नवाबपुरा येथे होणार असल्याचे अध्यक्ष सागर पाटणी, महामंत्री प्रशांत पांडे यांनी कळविले आहे.
प.पु.राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांच्या आर्शिवादाने इतिहासात दुस-यांचा राज्यस्तरीय महाआरती व नृत्यस्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम,दितीय,तृतीय विजेत्यास डायटोरा चे सुमित सुभाषचंद पाटणी यांच्या वतीने रोख बक्षीस दिले जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.
वरील कार्यकमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्राजेक्ट चेअरमेन अक्षय पाटणी, संदेश जैन, सागर लोहाडे, सुमित सोनी, योगेश काला, हर्षल सेठी यांच्यासह राष्ट्रीय संयोजक सुनिल काला, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रसाद पाटणी, पंचायत अध्यक्ष महावीर पाटनी सचिव प्रकाश अजमेरा अध्यक्ष सागर पाटणी, महामंत्री प्रशांत पांडे, संयोजक सुचित बाकलीवाल, मंत्री चेतन गंगवाल, उपाध्यक्ष राहुल कासलीवाल, कार्याध्यक्ष योगेश काला, कोषाध्यक्ष रुपेश ठोले, सांस्कृतिक मंत्री सुमित सोनी, प्रवक्ता संदेश जैन, व पुलक मंच शहर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहीती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली.