Marmik
Hingoli live News

दोन ढाण्या वाघांची मुंबईत ग्रेट भेट

हिंगोली : संतोष अवचार

विधान परिषदेच्या विशेष अधिवेशनासाठी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर मुंबई येथे गेले असता चेंबूर येथे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांची भेट घेतली. या दोन्ही कट्टर शिवसैनिकांनी भेट घेतल्याने दोन ढाण्या वाघाची भेट झाल्याची चर्चा हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र होत आहे.

राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या नंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा व बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाची सत्ता आली. तसेच सध्या मुंबई येथे विधान परिषदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर हे तेथे हजर असून आमदार संतोष (दादा) बांगर हे चेंबूर भागात गेले असता तेथील शिवसेना शाखाप्रमुख ठाणे सर्वसामान्यां साठी जनता दरबार भरवून त्यांच्या समस्या तळमळीने सोडविणारे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांच्या शिवसेनेचे कट्टर आमदार संतोष (दादा) बांगर हे आले असल्याची बाब त्यांच्या कानावर टाकली असता नितीन नांदगावकर यांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांची भेट घेतली व दोघांच्याही चांगल्याच गप्पा रंगल्या. आमदार संतोष दादा बांगर व नितीन नांदगावकर हे दोघेही सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतःच्या जिवाचे रान करीत असतात. तसेच जनतेच्या समस्या तळमळीने सोडवत असतात. शिवसेनेचे हे दोन्ही ढाण्या वाघ हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवसेना घडविण्यासाठी नेहमीच झटत असतात.

या भेटीदरम्यान युवा सेना हिंगोली जिल्हा प्रमुख राम भाऊ कदम लोणावळा येथील उद्योजक करीन भाई डॉक्टर आंबेडकर अजिंक्य नागरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related posts

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर उद्यान व सुशोभीकरणासाठी हिंगोली नगर परिषदेच्या ताब्यात द्या; सकल मातंग समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वन मंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन

Santosh Awchar

पिंपळदरी शेत शिवारात आढळला गांजा! एक लाख 89 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

ट्रॅक्टर चोरीची फिर्याद देणाराच निघाला 420! कर्ज बुडविण्यासाठी रचला कट

Santosh Awchar

Leave a Comment