हिंगोली : संतोष अवचार
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , जिल्हास्तरीय सामाजिक शक्ती प्रदत्त समिती हिंगोली च्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यालया, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली येथील सभागृहात आज दिनांक 26 जून रोजी दुपारी 12 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्याचप्रमाणे क्रांतीज्योती महात्मा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, डॉ.गीते, महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर,दलित मित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार, शिवाजी महाविद्यालय चे प्रा.किशोर इंगोले , निरज देशमुख, विशाल इंगोळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष गुण घेऊन पास झालेल्या मुला – मुलींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य गणेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे, प्रा.किशोर इंगोले, दलित मित्र संघाचे डॉ.विजय निलावार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ गोवंदे, नागनाथ नकाते, नितीन राठोड, मोतीराम फड, आत्माराम वागतकर, सुरेश पठाडे, सुनिल वडकुते, भास्कर वाकळे, बालाजी टेंभूर्ने, सुलोचना ढोणे, सिंधू राठोड, गीतांजली पडलवार, पल्लवी गीते, प्रफुल्ल पट्टे बहादुर, विजय सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.