मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
नंदगाव – औंढा नागनाथ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री सिद्धनाथ महादेव मठ येथे गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दिवसभर भाविकांनी रांगेत उभे राहून श्री सिद्धनाथ महादेव महाराजांचे आणि आत्मानंदगीर महाराज यांचे दर्शन घेतले.
औंढा नागनाथ तालुक्यातील तीर्थक्षेत्र सिद्धनाथ संस्थान गांगलवाडी येथे 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.
याप्रसंगी जवळपास 25 हजार भाविकांनी तीर्थक्षेत्र सिद्धनाथ येथे नाथगंगा – सिद्धगंगा संगमावर स्नान करून सिद्धनाथ महादेव यांचे दर्शन घेतले.
तसेच यानिमित्त सकाळपासून महंत आत्मानंद गिर महाराज यांना गुरु करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांना चहा – पाण्याची व्यवस्था आत्मानंद गीर महाराज यांनी केली होती.
सकाळपासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत येथे दर्शनासाठी भाविक दाखल झाले होते.