मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे व सराईत गुन्हेगार यांच्याविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे.
3 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीत तबेला परिसरातील इनायतखा इस्माईलखा पठाण यांच्या दुकानात छापा टाकला असता सदर ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेली व मानवी शरीरास हानिकारक असलेली विमल, रजनीगंधा, v-1 टॅबॅको, प्रीइएम आर एम डी व इतर असा गुटखा तंबाखू पान मसाला मिळून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून नमूद दुकानदार व त्याचा मुलगा विधीसंघर्षग्रस्त बालक व नांदेड येथील गोल्डन जर्दाचा दुकान मालक यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादंवि सह अन्नसुरक्षा अधिनियम अन्वय पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कार्यवाहीत हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्रभुदास स्वीट मार्ट दुकानासमोर नामे भैय्यालाल जमनालाल जयस्वाल राहणार तोफखाना हा अवैधरित्या विक्रीकरिता स्वतःच्या मोटार सायकलवर विदेशी दारू ज्यात मॅकडॉल नंबर एकच्या 96 बॉटल, रॉयल स्टॅगच्या 48 बॉटल, इम्पिरियल ब्लू च्या 48 बॉटल, असे एकूण 16,560 रुपयांचा मुद्देमाल घेऊन जात असताना मिळून आल्याने नमूद विदेशी दारू विद्यमान व मतदार सायकल (जिची किंमत 60 हजार) असा एकूण 76 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादविसह महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, राजूसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे, किशोर सावंत, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, सुमित टाले महाराष्ट्र पोलीस अंमलदार रवीना घुमणर यांनी केली.