मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे मकर संक्रात निमित्त हळदी – कुंकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील साईबाबा गल्ली येथे मकर संक्रातीचे औचित्य साधून हळदी – कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महिलांनी हिंदू संस्कृत परंपरा जोपासून प्रथम लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. नंतर महिलांनी एकत्र येऊन गावातील सर्व महिलांना निमंत्रित केले.
उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदी – कुंकू लावून वान लुटले. तसेच महिलांनी उखाणेही घेतले. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच बहारदार झाला.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक दिपाली देशमुख, शोभाबाई लिगाडे, केसर इंगोले, गीता काळे, मीना काळे, सुलोचना जाधव, वैशाली दळवी आदी महिलांनी परिश्रम घेतले.