मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम हा जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 12 ऑगस्ट रोजी हिंगोली शहरातील खडकपुरा येथे हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यासह देशभर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत दरम्यान हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात आहे. प्रशासनाकडून सदरील उपक्रम राबविण्यासाठी काही शुल्क घेऊन भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे.
हिंगोली शहरातील खडकपुरा येथील विकास टाले यांनी त्यांच्या रास्त भाव दुकान येथे हर घर तिरंगा हा कार्यक्रम घेऊन लाभार्थी व नागरिकांना मोफत भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा उपलब्ध करून दिला तसेच मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज याचे वाटप करण्यात आले.
यावेळी हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, विकास टाले, विशाल गोटरे, प्रवीण टाले, मोहन बांगर नवनाथ कानबाळे, अभयकुमार गोरे, प्रदीप दोडल, नंदकुमार रवणे, संदीप भोसीकर, धनंजय कंधारकर, संजोग करेवार, शिवराज टाले यांच्यासह प्रभागातील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.