मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – बैल जोडी चोरी करून ते चोरीच्याच टेम्पो घालून नारेगाव येथील एका कसायास ही बैल जोडी विक्री करून पुन्हा टेम्पो ज्या जागेवरून चोरला त्या जागी सोडणाऱ्या चोरट्यांना हर्सूल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हर्सूल पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 288/23 कलम-379 भादंवि या गुन्ह्यातील फिर्यादी संदिप नंदकिशोर आंताडे (वय-३६ वर्ष व्यवसाय शेती रा. शिवनेरी कॉलनी हर्सूल कोलढाणयाडी रोड छत्रपती संभाजीनगर) यांनी दि. २२/१२/२३ रोजी तक्रार दिली की, त्यांचे ७५ हजार रुपये किंमतीचे माळवी जातीचे पांढऱ्या रंगाची बैलजोडी अज्ञात आरोपीने चोरुन नेल आहे. याबाबत पोलीस स्टेशन हर्सूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच पोस्टे हर्सूल येथील गुर.न. २९३/२३ कलम-३७९ भा.द.यो मधिल मोटर सायकल एच.एफ. डिलक्स MH-२०-GL-६५५० काळ्या रंगाची घरासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे, असे दोन गुन्हे होते.
पोलीस ठाणे हर्सूलचे विशेष पथकाचे अंमलदार/अधिकारी यांना गोपणीय बातमीदार यांनी माहिती दिली को, दि. 22/12/2023 रोजी हर्सूल हदीतुन चोरलेली बेल जोडी ही महादु लालमन राठोड व शेख सलमान रा. हर्सूल व त्याचे चार ते पाच जोडीदार यांनी चोरल्याची माहीती मिळाली.
यावरुन महादु राठोड व शेख सलमान यांचा शोध घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी अतुल तुकाराम दाभाडे (वय २२ वर्षे), प्रकाश पंडीत राठोड (वय २१ वर्षे), अशरफ उर्फ गुड्डु लतिफ शेख, अरबाज, अकिल कुरेशी यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन गोपनिय बातमिदाराच्या मदतीने आरोपी क्र. ०१ ते ०५ यांना ताब्यात घेतले.
त्यांची ३ दिवस पोलीस कोठडी घेतली पोलीस कोठडी दरम्यान आरोपीतांनी सांगितले की, दि. 22 डिसेंबर 2023 रोजी आम्ही फकिरवाडी येथुन अतुल दाभाडे याची कार क्र. MH-२०-AG-८८९२ मारुती अल्टो मध्ये जाऊन जामा मस्जीद नेहरुनगर येथून
ASHOK LYLAND DOST टेम्पो वाहन क्र. MH०१-BR-१४२० हे चोरुन आणले व हर्सूल येथून बेल जोडी टेम्पोत टाकुन ती नारेगाव येथील कस्साई अकिल कुरैशी यास बैलाची विक्री केली व परत टॅम्पो जामा मस्जीद येथे जागेवर लावण्यात आला. यावरुन नारेगाव येथुन चोरीस गेलेल्या बैल जोडीतील एक बैल अकिल कुरैशी याच्या दुकानासमोरुन जप्त करण्यात आला.
तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच यातील आरोपीतांनी याअगोदर पोच ते सहा दिवसापूर्वि पोलीस स्टेशन हद्दीतुन जहांगिर कॉलनी येथुन एक एच एफ डिलक्स मोटर सायकल चोरल्याची कबुली देऊन तो काढून दिली आहे.
सदरची गाडी दोन पंचा समक्ष त्याचे कडून जप्त केली.नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी अरबाज व अकिल कुरैशी याचा शोध घेणे चालु आहे. नमुद आरोपींकडून एक बैल, मोटार सायकल असा एकूण 90 हजार रुपये किमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त नवनित कॉवत, सहाय्यक पोलीस आयुक्तसाईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, पोलीस उप निरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस उप निरीक्षक मारुती खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक डि.टी. दांगोडे,
पोलीस उपनिरीक्षक राजु मोरे, सफौ/ फरकाडे, पोह/ हंथिर, कदम, ठाणगे पोना दहीफळे, शिवाजी शिंदे, पोलीस अंमलदार, श्रावण गुंजाळ, अनिल पवार, केसरसिंग गुसिगे, अमोल साळवे यांनी आरोपी महादु लालमन राठोड (वय १८ वर्षे रा. हर्सल फुलेनगर शिवशंकर कॉलनी छत्रपती संभाजीनगर), शेख सलमान शेख कैसर
(वय १९ वर्ष रा. यासिननगर हर्सूल छत्रपती संभाजीनगर), अतुल तुकाराम दाभाडे (वय २२ वर्षे रा. एकनाथनगर पिसादेवी परिसर मारोतीमंदीराजवळ छत्रपती संभाजीनगर), प्रकाश पंडीत राठोड (वय २१ वर्ष रा. हरसिध्दी माता मंदिराच्या पाठमागे हरसुल छत्रपती संभाजीनगर), अशरफ उर्फ गुड्डु लतिफ शेख (वय-२३ वर्षे रा. फकिरवाडी हर्सूल, छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे विचारपुस करुन गुन्ह्यातील गेला माल एक बेल व मोटरसायकल हस्तगत करुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चांगली कामगिरी केली आहे.