Marmik
Hingoli live क्राईम

हट्टा, कुरुंदा व आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याने केली उत्कृष्ट कामगिरी! पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्रक व बक्षीस जाहीर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली चा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करणे, प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्ज प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणे, लपून छपून सुरू असलेले अवैध धंद्यावर कार्यवाही मोहीम तसेच जनता व पोलीस सुसंवाद अधिकाधिक वाढावा यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत.

दामिनी पथक, पेट्रोलिंग, भरोसा सेल, पोलीस दीदी / काका उपक्रम, जातीय सलोखा, सामाजिक सदभावना वाढीसाठी कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, सतर्क रात्रगस्त व कोंबिंग ऑपरेशन आदी माध्यमातून चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी प्रयत्न करत आहेत.

जिल्ह्यातील सर्व तेराही पोलीस ठाण्यामध्ये वरील सर्व बाबी व इतर प्रमुख बाबीनुसार प्रभावी कामगिरी व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक महिन्यात सर्व 13 ही पोलीस ठाण्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करून व सर्वंकष बाबींचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप तीन पोलीस ठाण्यांची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.

या योजनेनुसार माहे नोव्हेंबर 2022 या महिन्याच्या मासिक अहवालाचे व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कामगिरीचे अवलोकन व मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप तीन पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार सर्वाधिक गुण प्राप्त करून व उत्कृष्ट कामगिरी करून हट्टा पोलीस ठाणे यांनी पहिला तर कुरुंदा पोलीस ठाणे यांनी द्वितीय व आखाडा बाळापूर पोलीस ठाणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

नमूद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हट्टा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बारोटे यांना प्रथम क्रमांक बद्दल प्रशस्तीपत्र व दोन हजार रुपये रोख बक्षीस सोबत सी – नोट, द्वितीय क्रमांकाबद्दल कुरुंदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गजानन मोरे यांना प्रशस्तीपत्र व 1500 रुपये रोख बक्षीस सोबत सी – नोट, तर तृतीय क्रमांकाबद्दल आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांना 1000 रुपये रोख बक्षीस व सोबत सी – नोट असे बक्षीस पोलीस अधीक्षक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

Related posts

तोषनीवाल महाविद्यालयाकडून वसतिगृहाच्या नावावर विद्यापीठ अनुदान आयोगाची आणि सीबीएससी च्या नावाखाली पालकांची लूट

Gajanan Jogdand

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची सेनगाव येथे कारवाई; 9 हजार 250 रुपयाचा दंड वसूल

Gajanan Jogdand

अट्टल दरोडेखोरास अग्नि शस्त्रासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

Gajanan Jogdand

Leave a Comment