हिंगोली : संतोष अवचार /-
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंद्यांना विरुद्ध व बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीची विशेष मोहीम सध्या जोरात सुरू आहे. तीन दिवसात तिघांवर कारवाई झाली असून 21 जून रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने गाडीपुऱ्यातील एकासं उचलले आहे.
21 जून रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गाडीपुरा परिसरातील रुपेश मुदीराज यास बेकायदेशीररित्या शस्त्र (तलवार) बाळगताना मिळून आल्याने त्यास दोन शस्त्रांसह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोह शंकर जाधव, शेख शकील यांनी केली.