Marmik
Hingoli live

आरोग्य विभागाची आढावा बैठक; साथरोग होऊ नये याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी – मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व जिल्हा समन्वयक यांची आढावा बैठक घेण्यात आली.यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमनिहाय आढावा घेण्यात आला.

कुष्ठरोग कार्यक्रमाबाबत सविस्तर आढावा घेतला व नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना लवकर उपचाराखाली आणणे तसेच माहे सप्टेंबर मध्ये जिल्ह्यात दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान कुष्ठरोग शोध व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार असल्याचे डॉ.सुनील देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर हिवताप रुग्णाबाबत आढावा घेण्यात आला.

यामध्ये आरोग्य कर्मचारी यांना गृहभेटी दरम्यान तापीच्या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्यांना उपचार द्यावा. तसेच संशयित  डेंग्यू रुग्ण आढळून आल्यास तात्काळ रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत व प्रतिबंधात्मक उपाय योजना करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या तापीच्या रुग्णाचे रक्त नमुने घ्यावेत व उपचार द्यावा व संसर्गजन्य आजाराबाबत आढावा घेण्यात आला. तसेंच प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र स्तरावर प्रसूतीचे प्रमाण वाढवावे.

नियमित लसीकरण हे नियोजित ठिकाणी नियोजित वेळेत करावे. ते कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येऊ नये, बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांना गुणात्मक व दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करावे, तसेच आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने कोविड-19 लसीकरण व बूस्टर डोस नागरिकांना देण्यात यावेत, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथरोग होऊ नये याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी. सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास राहावे. भेटी दरम्यान गैरहजर आढळून आल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास  शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल, डॉ.नामदेव कोरडे, डॉ.संदीप काळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ.सुनील देशमुख, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश जाधव, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, कमलेश ईशी, श्रीमती वडकुते, अनिता चव्हाण, आरोग्य सहाय्यक डी. आर. पारडकर, अमोल कुलकर्णी, संदीप मुरकर, अजहर अल्ली, बापू सूर्यवंशी, मुनाफ आदी उपस्थित होते.

Related posts

विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलची राज्यस्तरीय बैठक संपन्न; 23 ऑगस्ट रोजी विधानभवन समोर करणार सामूहिक आत्मदहन आंदोलन

Gajanan Jogdand

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आमदार तानाजी मुटकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Gajanan Jogdand

Hingoli संभाजीनगर येथे अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती मेळावा

Gajanan Jogdand

Leave a Comment