Marmik
Hingoli live News

आरोग्य विभागाने सतर्क रहावे; उपसंचालक डॉ. साधना तायडे यांच्या सूचना

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून covid-19 च्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. साथरोग होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने सतर्क राहावे, अशा सूचना महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर साधना तायडे यांनी हिंगोली आरोग्य विभागास दिल्या.

25 जुलै रोजी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात राज्याच्या आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुनिता गोलाईत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. निरगुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, डॉ. लखमावार, डॉ. मोरे, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. देवेंद्र जायभाये, क्षेत्र कर्मचारी मल्हारी चोपडे, सतीश नलगे, डी. एस. चौधरी आदींची उपस्थिती होती.

यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. साधना तायडे व औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक डॉ. सुनिता गोलाईत यांनी आढावा बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय कार्यक्रम निहाय आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील पूर परिस्थिती याबाबतही माहिती घेतली. covid-19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच मोफत covid-19 व बूस्टर डोस वाढविण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात covid-19 लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करून लसीकरण व बूस्टर डोस चे प्रमाण वाढवावे साथरोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Related posts

हे सरकार गोरगरीब, सर्वसामान्यांचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gajanan Jogdand

पत्रकार बबन सुतार यांना पितृशोक

Gajanan Jogdand

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस: उल्हासनगरात रक्तदान शिबिर; 518 बॅग रक्त संकलन

Gajanan Jogdand

Leave a Comment