Marmik
Hingoli live News

सर्वदूर दमदार पाऊस; शेतकरी सुखावला

हिंगोली : संतोष अवचार

जिल्ह्यात काल रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत सर्वदूर दमदार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले तर अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली झालेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.

हिंगोली जिल्ह्यात 4 जुलै सोमवार रोजी आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 26.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 19.97 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.           

जिल्ह्यात आज दिनांक 04 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.           

हिंगोली 22.40 (216.50) मि.मी., कळमनुरी 37.50 (162.70) मि.मी., वसमत 32.70 (154.90) मि.मी., औंढा नागनाथ 24.60 (159.80) मि.मी, सेनगांव 16.50 (156.30) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Related posts

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार कायद्याची होळी! अंमलबजावणी होत नसल्याने केला निषेध

Santosh Awchar

महागाईविरोधात काँग्रेस कडून आंदोलन

Santosh Awchar

Hingoli संभाजीनगर येथे अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती मेळावा

Santosh Awchar

Leave a Comment