मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना आज रक्षा बंधनानिमित्त मदतीचा हात म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्ग पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वसमत येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे यांच्या संकल्पनेतून व केलेल्या आवाहनातून एक लाख सात हजार रुपये रोख रक्कम जमा झाली होती. ती आज रक्षा बंधनानिमित्त आशाताईना साडीचोळीसह रोख रक्कम देऊन मदतीचा हातभार लावण्यात आला.
याकामी आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय तसेच पाचही तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, गट प्रवर्तक, आशा इत्यादीनी याकामी सढळ हाताने निधी उभारण्यास मदत केली. तद्वतच डॉ.काळे यांचे विदेशात राहणारे मित्र बालाजी अन्नमवार यांनीही दहा हजार रुपये मदत निधी पाठविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन सेनगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतिश रुणवाल, वसमतचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे, जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन कदम, आरोग्य सहायक आर.एन.आरगळ, व आरोग्य कर्मचारी एल. बी. भोसले, तालुका आरोग्य अधिकारी वसमत कार्यालयातील कर्मचारी वर्ग तसेच गट प्रवर्तक व आशाताई इत्यादी अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
सढळ हाताने आर्थिक मदत केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा व मित्र परिवाराचे वसमतचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे यांनी जाहीर आभार व्यत केले.