आरोग्य
तिखट खाण्यात आल की मात्र आता आपल काही खरचं नाही असचं व्हायचं. शौचास जाऊन आलो की असाहाय्य वेदना व्हायच्या . बसायलाही त्रास म्हणजे बसताच येत नव्हते. घर मालिकीणीने कमलनयन बजाज दवाखान्यात जायचं सुचवलं.
गेल्या वर्षीपासून फिशरचा त्रास सुरु झाला होता. नेमकं आपलं काय दुःखतयं हेच कळायला एक महिना गेला. पोट व्यवस्थित साफ होत नव्हते. शौचास गेल्यावर प्रचंड वेदना व्हायच्या. मनात भिती होती की आपल्याला मूळव्याध झाला आहे. औरंगाबादेत नोकरीनिमित्त राहतोय. तिखट खाल्ल तर त्रास होत होता. मग रुम जवळील औषधाच्या दुकानात जाऊन गोळ्या आणत. त्या घेतल्यावर वेदना कमी व्हायच्या. कस तरी एक महिना काढला. शेवटी माझ्या गावातील नेवासा येथील डाॅक्टरांना भेटलो. काय-काय त्रास होतोय हे त्यांना सांगितलं. मुळात डाॅक्टरांकडे लहान असल्यापासून आजारी पडलो की त्यांच्याकडे जात.वाटल आता आपला त्रास संपणार आहे.
साधारण दोन-तीन महिने उपचार घेतला. डाॅक्टरला विचारल की मला मूळव्याध झाला आहे का? त्यांचे उत्तर, शौचाच्या जागी दुखण म्हणजे मूळव्याधच असतं. त्यांनी आपल्या दवाखान्यात मूळव्याधी विषयी चिटकवलेलं माहिती पत्रकाचे मोबाईलमध्ये फोटो काढण्याचे सांगितले. मी फोटो काढला. मग आठवडाभर माहितीपत्रकावरील मार्गदर्शक सूचना पाळू लागलो. जास्त पाणी पिणे, फिरण्याचा व्यायाम, कडधान्य खाणे, ताक पिणे आदी आदी.सर्व पाळू लागलो. काम संपल की दोन किलोमीटर फिरुन यायचो. पण व्हायच्या त्या वेदना होतच असतं.
डाॅक्टरांना पोट साफ होत नाही म्हणून १००-१५० रुपयांची औषधाची बाटली लिहून दिली. हे औषध दररोज रात्री घ्यायला मला सांगितले. पण तिखट खाण्यात आल की मात्र आता आपल काही खरचं नाही असचं व्हायचं. शौचास जाऊन आलो की असाहाय्य वेदना व्हायच्या . बसायलाही त्रास म्हणजे बसताच येत नव्हते. घर मालिकीणीने कमलनयन बजाज दवाखान्यात जायचं सुचवलं.
या दवाखान्यात डाॅक्टरची ख्याती सर्वत्र. म्हणजे अवती-भवती मूळव्याधीसाठी त्यांचच नाव सांगितले जात. मलाही वाटल एकदा जाऊन येऊच. आपल्याला खरचं मूळव्याध झाल आहे हे तरी कळेल. बरं डाॅक्टरला भेटण्यास पाचशे रुपये घेण्यात आले. दोन दिवसांनी भेटायला बोलवले. येताना काहीही खायचे नाही, असे सांगण्यात आले. त्या प्रमाणे मी गेलोही.
डाॅक्टरपर्यंत जाण्यापूर्वीच रक्त, लघवी तपासणीसाठी साधारण पावणे तीन हजार रुपये खर्च आला.डाॅक्टरच्या कॅबिनमध्ये गेलो. माझी तपासणी करतानाच काय त्रास होतो. मग हे खाल्ल्याने त्रास होतो, तर ते खायचे नाही. डाॅक्टरने औषधाची चिठ्ठी लिहून दिली. त्यावर शिक्का होता, दररोज गरम पाण्यात बसायचे. पुन्हा भेटायला या वगैरे काही डाॅक्टर म्हणाले नाही. पण मला प्रसिद्ध डाॅक्टरचा काहीच फायदा झाला नाही. मला नेमका कशाचा मूळव्याधी की फिशरचा त्रास होतोय हे कळच नाही.
या ख्याती असलेल्या डाॅक्टरने माझी निराशाच केली. पुन्हा पाढे पंचावन्न सुरु. त्रास सुरु झाला. मग माझ्या आजीने बंगाली डाॅक्टरकडे नेले. मुळात हे डाॅक्टर निसर्गोपचार करत असतात. त्यांनी तपासणी करुन सांगितले, की तुला फिशरचा त्रास होतोय. त्यांनी मला गोळ्या आणि घरी बनवलेला मलम लावायला दिला. काही प्रमाणात त्रासापासून सुटका झाली. त्यांनी फळभाज्या खायला सांगितले.
मांसाहार वर्ज्य करण्यास सांगितले.पण मला रामबाण उपाय मिळालाच नाही. कसतरी एक वर्ष त्रास सहन केला अखेर या वर्षी गावात फिशरवरील इंजेक्शन घेतलं. दोन आठवडे प्रचंड त्रास झालां. बसताच येत नव्हतं. आता कुठेतरी बस वाटायला लागलं आहे.
(सदरील लेख हा संभाजीनगर येथील प्रख्यात पत्रकार गणेश पिटेकर यांच्या ब्लॉगस्पॉट वरून घेण्यात आला आहे.)