Marmik
क्राईम

हिंगोलीत पुन्हा गांजा पकडला; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातील अंबिका टॉकीज येथे शासनाने प्रतिबंधित गांजा दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी नांदेड नाका येथून पोलिसांनी गांजा जप्त केला होता. त्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे.

27 डिसेंबर 2023 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथक अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री विरुद्ध कार्यवाहीसाठी हिंगोली शहरात पेट्रोलिंग करत होते.

यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरातील अंबिका टॉकीज परिसरात इसम नामे सचिन नारायण बालगुडे हा अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली.

यावरून दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू व त्यांच्या पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया करून नमूद इसम नामे सचिन नारायण बालगुडे (वय 40 वर्ष रा. गवळीपुरा) यास 1 किलो 46 ग्रॅम वजन असलेले अमली पदार्थ प्रतिबंधित गांजा (ज्याची किंमत 15 हजार 960 रुपये) सह ताब्यात घेऊन नमूद सचिन बालगुडे यास विचारपूस करता त्याने सदरचा गांजा त्याला शहरातील आनंद पाईकराव (रा. रीसाला बाजार) याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले.

यावरून इसम नामे सचिन नारायण बालगुडे व आनंद पाईकराव यांच्याविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलापिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, धनंजय पुजारी, दिलीप बांगर, शेख शफियोद्दीन, शेख रहीम दहशतवाद विरोधी शाखा यांनी केली.

Related posts

हिंगोली पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; तडीपरीचे आदेश झुगारून वावरणाऱ्या दोघांना पकडले

Santosh Awchar

17 टवाळखोर व्यक्तींवर दामिनी पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई

Santosh Awchar

पोलिसांचे जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन; संशयास्पद फिरणाऱ्या 11 व्यक्तीविरुद्ध कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment