Marmik
Hingoli live

‘हिंगोली भूषण’ नायशा अन्सारी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील एबीएम केंद्रीय शाळेतील हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त कुशाग्र विद्यार्थिनी नायशा अन्सारी हिची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तिच्यासोबत आर्यन हजारे या विद्यार्थ्यांची देखील निवड झाली आहे.

उत्तुंग तेज फाउंडेशनकडून दरवर्षी उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून 60 विद्यार्थी निवडले जातात. यंदा 65 विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे समजते.

या परीक्षेत हिंगोली येथील एबीएम केंद्रीय शाळेतील हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त कुशाग्र बुद्धिमत्तेची विद्यार्थिनी नायशा अयाज अन्सारी व आर्यन हजारे या विद्यार्थ्यांनी भरगोस यश संपादन करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.

त्यानंतर त्यांची सदरील फाउंडेशनकडून इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना आयआयटी, सायन्स सिटी येथे विज्ञान अभ्यास दौराही असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त दिलीप बांगर, संकल्प बहुउद्देश विषय अभावी संस्थेचे अध्यक्ष, सचिव संतोष अवचार, प्राचार्य रॉबिन वर्गीस, अजिंक्य बांगर, उपप्राचार्य सचिन डोईफोडे, सहशिक्षक संतोष टाले, नायशाची आई – वडील तरंनुम अयाज अन्सारी आर्यनचे आई – वडील वर्षा नितीन हजारे यांनी कौतुक केले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे जिल्हा भरातून अभिनंदन होत आहे.

Related posts

मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! 14 मोटरसायकल सह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

श्रीराम नवमी: हिंगोली पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Gajanan Jogdand

मुगाला लक्ष्मी पावली! 6 हजार 320 रुपयांचा मिळाला दर

Santosh Awchar

Leave a Comment