मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / परमानंद तांबिले :-
वाघजाळी – महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आजेगाव च्या वतीने दाताडा बुद्रुकद्रुक येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बँकेच्या वतीने करण्यात आलेले वित्तीय साक्षरता शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने 20 जुलै रोजी दाताडा बुद्रुक येथे वित्तीय साक्षरता शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमास शाखा व्यवस्थापक एस. एम. शेंडगे, ये.डी. अंभोरे, लेखापाल आर. एस. अत्रे, बँक सेवक सचिन जोगे, दाताडा बु. चे सरपंच संगेकर, मित्र विकास साबळे, बँक मित्र परमानंद तांबिले, पत्रकार भारत शिंदे, संतोष दिवाने आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावातील महिला व ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजना सांगून बँकेचा कारभार कसा चालतो व गुंतवणूक आणि बचत या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी बँकेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. सध्या जिल्हाभरात पावसाचा जोर वाढलेला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नवीन झाडे लावून जगविण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. तसेच झाडे लावून पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल ही भूमिका या मागे असून झाडे लावणे काळाची गरज आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँके कडूनही दाताडा बुद्रुक गावात विविध ठिकाणी वृक्ष लावून ही झाडे सजविली जातील असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.