मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
हिंगोली – जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प संचालक आत्माराम बोंद्रे यांच्या सनियंत्रणाखाली 16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते.
जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा कार्यक्रमात प्रथमता गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रीती माकोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र सरकटे यांनी केले आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रीती माकोडे व तसेच विस्ताराधिकारी विष्णू भोजे, प्रा. टी जे कदम, प्रा. मुरलीधर जायेभाये, प्राध्यापक वाघ, प्रा.धाराशिव शिराळे, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ शामसुंदर मस्के, प्रशांत कांबळे, विष्णू मेहत्रे, भास्कर देशमुख, किशोर पडोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेमध्ये कनिष्ठ विभागातून प्रथम- कांबळे विशाल विजय, द्वितीय- मांदळे रेणुका संतोष, तृतीय-कल्याणकर स्तुती प्रभाकर तसेच वरिष्ठ विभागातून प्रथम -विश्रांती सुभाषराव मगर, द्वितीय -तेजस्विनी संजय सुर्वे, तृतीय- आरती केशव इंगोले या सदरील स्पर्धक हे जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र ठरले आहेत.
सदरील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ. टी.जे.कदम, प्रा. मुरलीधर जायेभाये, प्रा. धाराशिव शिराळे , प्रा. वाघ यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र सरकटे यांनी केले.