मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी 3 जानेवारी रोजी 418 हजर होते यापैकी 391 उमेदवार पात्र ठरल्याने या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे मैदानावर उपस्थित झाले होते.
शासन निर्णयानुसार राज्यभरात 2 जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. सदरील शासन निर्णयानुसार हिंगोली जिल्हा पोलीस भरती घेतली जात असून पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी 3 जानेवारी रोजी पोलीस भरतीसाठी 620 उमेदवारांना बोलावण्यात आले होते.
यापैकी 418 उमेदवार हजर झाले तर 202 उमेदवार गैरहजर राहिले. 418 उमेदवारांपैकी 391 उमेदवार पात्र झाले तर 27 उमेदवार अपात्र ठरले पात्र 391 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.
यामध्ये शंभर मीटर धावणे, 1600 मीटर धावणे व गोळा फेक अशी मैदानी चाचणी घेण्यात आली. सदरील मैदानी चाचणी 50 गुणांची होती.
4 जानेवारी रोजी 164 महिला व 4 माजी सैनिक असे 168 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.