मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील डी – इफेक्ट डान्स अकॅडमी च्या वतीने 29 जुलै रोजी हिंगोली आइडल _6 आयोजित करण्यात आली आहे.
नृत्य क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या हिंगोली येथील डी – इफेक्ट डान्स अकॅडमी दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. या उपक्रमातून अकॅडमीचे विद्यार्थी व त्यांचे करियर घडविण्याचे काम केले जाते.
अकॅडमीच्या वतीने नृत्य क्षेत्रात भविष्य घडविणाऱ्या मुला – मुलींना राज्य व देश पातळीवर घेऊन जाण्याचे काम अकॅडमी च्या वतीने केले जाते.
अकॅडमीच्या वतीने 29 जुलै रोजी अकोला बायपास येथील मधुरदीप पॅलेस येथे हिंगोली आयडल सहा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इंडियाज बेस्ट डान्सर, डान्स प्लस, महाराष्ट्र बेस्ट डान्सर, सेलिब्रिटी राम बिट्स हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 21 हजार रुपयांचे दिले जाणार आहे. तर द्वितीय पारितोषिक 11000 रुपये, तृतीय पारितोषिक सात हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक 3000 रुपये व पाचवे पारितोषिक 1000 रुपये असे दिले जाणार आहे.
या स्पर्धेत नृत्य क्षेत्रात भविष्य घडविणाऱ्या व घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सागर चौधरी संचालक डी – इफेक्ट डान्स अकॅडमी हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.