Marmik
हिंगोली कानोसा

हिंगोली लोकसभा: दोन्ही शिवसेना उमेदवारात अतितटीची लढत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – 15 – हिंगोली लोकसभा निवडणुकीची मतदान मोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली आहे. पहिल्या फेरीत बाबुराव कदम कोहळीकर हे 17 हजार 145 मते घेऊन आघाडीवर होते. आष्टीकर हे 16 हजार 212 मते घेऊन दोन नंबर वर होते दुसऱ्या फेरीत मात्र चित्र पालटले असून आष्टीकर हे 35 हजार 391 मते घेऊन आघाडीवर आहेत.

15 – हिंगोली लोकसभेची दुसरी फेरी पार पडली आहे. पहिल्या फेरीत 46 हजार 553 मतांची मोजणी झाली असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना 17,145 मते पडली.

तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांना 16 हजार 212 मते पडली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बी. डी. चव्हाण यांना 8 हजार 75 मते पडली.

पहिल्या फेरीत बाबुराव कदम कोहळीकर हे आघाडीवर होते. मात्र दुसऱ्या फेरीत नागेश पाटील आष्टीकर हे 35 हजार 391 मध्ये घेऊन आघाडीवर आहेत तर बाबुराव कदम कोहळीकर हे 34 हजार 482 मते घेऊन दोन नंबर वर आहेत. डॉ. बी. डी. चव्हाण हे 14 हजार 408 मते घेऊन तीन नंबर वर आहेत. शिवसेनेच्या उमेदवारात काट्याची टक्कर पहावयास मिळत आहे.

Related posts

शिवसेनेकडून आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी

Gajanan Jogdand

हिंगोली पर्यंत येणार ‘जनशताब्दी’, दररोज धावणार रेल्वे

Santosh Awchar

हिंगोली विधानसभा निवडणूक: उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये चुरस; अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग!

Gajanan Jogdand

Leave a Comment