मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यात 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोग यांची मान्यता प्राप्त झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी जिल्हास्तरावर शासनाच्या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 92-वसमत, 93-कळमनुरी व 94 हिंगोली विधानसभा मतदार संघ,
जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली असून, मतदारांना ती पाहण्यास उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.