Marmik
Hingoli live

उद्या हिंगोली लोकसभेचा निकाल, सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त मतमोजणी निरीक्षक एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारुती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतमोजणी कक्षातील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मेघना कावली, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी क्रांति डोंबे, डॉ. सखाराम मुळे, डॉ. सचिन खल्लाळ, अविनाश कांबळे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

मतमोजणी निरीक्षक एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारुती यांनी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांची आसनव्यवस्था, विधानसभा क्षेत्रनिहाय तयार करण्यात आलेले सहा मतमोजणी कक्ष, टपाली मतमोजणी कक्ष, ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर कक्षाची पाहणी केली. तसेच याठिकाणी मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सज्जतेचा आढावा घेतला.

तसेच टपाली मतमोजणी कक्षाला भेट दिल्यानंतर इन्कोअर अँप, ईटीपीबीएस आणि टँब्युलेशन शीटबाबात मतमोजणी निरीक्षकांनी जिल्हा सूचना अधिकारी बारी सिद्दिकी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतमोजणी निरीक्षकांना केंद्रातील यंत्रणेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी येथील माध्यम कक्षाला भेट दिली.

माध्यम कक्षात माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीची उमेदवारांना पडलेली फेरीनिहाय मतांची तात्काळ माहिती व्हावी, तसेच देशभरातील मतदार संघाचे निकाल पाहता यावेत, यासाठी तशी सुविधा पुरविण्यात येणार आहे.निवडणूक आयोग किंवा यंत्रणेकडून प्राप्त सुरक्षा पासधारकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार आहे.

येथे तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात असून, मतमोजणी निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना मोबाईल वापरता येणार असून, इतरांना मोबाइल बंदी आहे.  

वैद्यकीय कक्ष स्थापन

मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणी प्रक्रि‌येत सहभागी अधिकारी – कर्मचारी, किंवा उमेदवार वा त्यांचे प्रतिऩिधींचे आरोग्य बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी येथे वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आगीसारखी घटना घडू नये यासाठी अग्निशामक दलाकडून येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कम्युनिकेशन हॉलचीही येथे व्यवस्था उभारण्यात आली आहे. 

94 टेबलवर होणार मतमोजणी

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट व हदगाव असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदारसंघात आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी 8 आणि ईटीपीबीएससाठी  2 टेबल आहेत. थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची  मतमोजणी  94 टेबलवर होणार आहे. 

एकूण मतदार व प्रत्यक्षात झालेले मतदान

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे  मतदान हे दुस-या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी  2008 मतदान केंद्रांवर पार पडले. या मतदारसंघामध्ये 18 लाख 17 हजार 734 मतदार आहेत. त्यापैकी 9 लाख 46 हजार 674 पुरुष, 8 लाख 71 हजार 035 महिला तर 25 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या एकूण मतदारांपैकी 6 लक्ष 28 हजार 302 पुरुष, 5 लक्ष 26 हजार 644 महिला तर 9 तृतीयपंथीय अशा एकूण 11 लक्ष 54 हजार 955 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष 66.37, महिला 60.46 आणि 36 टक्के तृतीयपंथीय मतदारांची टक्केवारी राहिली आहे. 15 – हिंगोली लोकसभा मतदारसंघात 63.54 टक्के मतदान पार पडले आहे.

 विधानसभा निहाय मतमोजणी फेरी

15- हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या वेगवेगळ्या राहणार आहेत.  यामध्ये उमरखेड 25, किनवट 24, हदगाव विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीच्या 23 फेऱ्या होतील. तर वसमत 24, आणि कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

Related posts

खटकाळी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यास लुटणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या! एक पिस्टल, तीन जिवंत काडतूसासह तीन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

जांभरून येथील घरफोडी प्रकरणातील आरोपी चार तासात गजाआड! 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

अग्नीपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध; सेनगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Gajanan Jogdand

Leave a Comment