हिंगोली / संतोष अवचार येथील नगर परिषदेची हिंगोली शहरातील नागरिकांकडे घरपट्टी व पाणीपट्टी असे दोन्ही मिळून दोन कोटीहून अधिक थकबाकी आहे. नागरिकांकडून कर भरणा बाबत आवश्यक प्रतिसाद मिळत नसल्याने 15 मार्च पासून हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने थकबाकीदारांना विरुद्ध जप्तीची कारवाई केली जाणार आहे. हिंगोली नगर परिषदेकडून मागील काही दिवसांपासून कर भरणा बाबत विशेष मोहीम राबविली जात आहे. गल्लीबोळात रिक्षा लावून कर भरण्याबाबत नागरिकांना आवाहन केले जात आहे; मात्र शहरातील नागरिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. वर्षाअखेरीस हिंगोली नगरपरिषदेला मालमत्ता कर म्हणून दोन कोटी 21 लाख 36 रुपये जमा झाला आहे; मात्र हा कर तीन कोटी 22 लाख 24 हजार रुपये एवढा आहे. पाणीपट्टी मागणी दोन कोटी 57 लाख 27 हजार रुपये एवढी असून हिंगोली नगर परिषदेकडे वर्षाअखेरीस 1 कोटी 3 लाख 36 हजार रुपये एवढी पाणीपट्टी जमा झाली आहे. नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याबाबत उदासीन असल्याचे दिसते. नगरपरिषदेकडून कर भरण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकपणा आणला गेला असून मोबाईल द्वारे ही कर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे; मात्र नागरिक कोणत्याही प्रकारे कर भरणा करत नसल्याने 15 मार्च पासून थकबाकीदारांना विरुद्ध जप्तीची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी जप्तीची कारवाई टाळावी नागरिकांनी त्यांच्याकडील थकित पाणीपट्टी व मालमत्ता कराचा भरणा वेळेत पूर्ण करावा कर भरणा बाबत हिंगोली नगर परिषदेकडून वारंवार आवाहन करण्यात आले मात्र या आवाहनास हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने 15 मार्च पासून हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे नागरिकांनी सदरील कारवाई टाळण्यासाठी वेळेच्या आत पाणीपट्टी व मालमत्ता कराचा भरणा करावा. – उमेश हेंबाडे,