Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

Hingoli पन्नास गावच्या सरपंचांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर टाकला विश्वास

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विश्वास टाकला आहे. या सरपंचांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे अभिवचन आमदार संतोष (दादा) बांगर यांनी त्यांना दिले.

राज्यातील राजकीय नाट्यस अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर लढाई म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हार मानलेली नाही. शिवसेना हा आपलाच पक्ष असे ते सांगत आहेत. या राजकीय लढाईने समाज मानकर ढवळून निघालेले आहे.

शिवसेनेचे मराठवाड्यातील एकमेव आमदार संतोष (दादा) बांगर यांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामध्ये आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या पाठीशी कार्यकर्ते व जनता भक्कमपणे उभी असल्याचे दिसते. त्यातच 23 जुलै रोजी कळमनुरी विधानसभा मतदार संघातील 50 ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची साद घालून त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निश्चयही घेतला. आमदार संतोष (दादा) बांगर यांनी या सरपंचांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही. त्यांच्या कोणत्याही अडीअडचणी आपण स्वतःहून सोडविणार असे सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील किमान पन्नास गावच्या सरपंचांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चय केल्याने आमदार संतोष (दादा) बांगर यांची कळमनुरी विधानसभा मतदारसंघावरील पक्कड अधिकच घट्ट झाली आहे.

Related posts

दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय सरकारी समिती गठीत!

Gajanan Jogdand

वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

Santosh Awchar

सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Santosh Awchar

Leave a Comment