मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील पोलिसांनी विशेष मोहिमेत धडक कार्यवाही करत न्यायालयाकडून प्राप्त एकूण 66 अटक वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालयात हजर केले आहे. यामुळे लपून बसलेल्या गुन्हेगारात खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात अजामीनपात्र, जामीनपात्र, पोटगी वॉरंट बजावणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमेत जिल्ह्यातील सर्व तेराही पोलीस ठाणे अंतर्गत प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष कामगिरी करत न्यायालयातून अनेक वेळा संबंध निघून तारखेवर हजर न राहणाऱ्या व ज्यांच्याबाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट झाले होते असे एकूण 66 अटक वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.
सदर मोहिमेत न्यायालयाकडून प्राप्त जामीन पात्र 56 वॉरंटची बजावणी करण्यात आली.