Marmik
Hingoli live News क्रीडा

हिंगोली चे पोलीस अंमलदार सहदेव जाधव ठरले बेस्ट ऍथलेट! 27 व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा दिमाखात समारोप

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – 27व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वाधिक क्रीडा प्रकारात पुरस्कार जिंकून नांदेड जिल्ह्याने स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद प्रथम क्रमांक मिळविले तर हिंगोली जिल्ह्याने या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद पुरस्कार जिंकले. या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत बेस्ट ऍथलेट (पुरुष) चे मानकरी हिंगोली येथील पोलीस अंमलदार सहदेव जाधव तर बेस्ट ऍथलेट (महिला) नांदेड येथील शिल्पा राठोड, पूजा नवले या ठरल्या.

20 ते 23 सप्टेंबर या दरम्यान हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान, नवीन पोलीस वसाहत मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बाराचे मैदान, जिल्हा क्रीडा संकुल हिंगोली, जलतरणीचा महानगर पालिका नांदेड येथे सर्व सुविधांनी उत्तम साहित्य व प्रशिक्षित तज्ञ पंचांच्या उपस्थितीत या स्पर्धा घेण्यात आल्या. सदरील स्पर्धेत नांदेड लातूर परभणी या चार जिल्ह्यातील जवळपास 512 पोलीस अधिकारी व अंमलदार पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते.

सदर परीक्षेतील क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक ॲथलेटिक्स मधील सर्व स्पर्धा जलतरण स्पर्धा व साहाजिक मधील कबड्डी खो-खो हॉलीबॉल बास्केटबॉल फुटबॉल हॉकी आधी सर्व स्पर्धा घेण्यात आल्या. चारही जिल्ह्यातील खेळाडूंनी अतिशय उत्साहात व खेळ भरलेले सदर स्पर्धेत सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखविले. या 27व्या नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप 23 सप्टेंबर रोजी संत नामदेव पोलीस कवायेत मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमास नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, हिंगोली पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, परभणी पोलीस अधीक्षक जयंत मीना, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली चे समादेशक संदीपसिंग गिल, परभणीचे अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समारोप कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांना मानवंदना दिल्यानंतर पुरुष व महिला खेळाडूंचे 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर निमंत्रित नागरिक व पोलिस अधिकारी यांच्यात रस्सीखेच स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर चारही जिल्ह्यातील खेळाडूंचे परेड मार्च व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र मेडल्स व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बक्षीस देण्यात आल्या.

या 27व्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक क्रीडा प्रकारात पुरस्कार जिंकून नांदेड जिल्ह्याने स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद प्रथम क्रमांक मिळविले तर हिंगोली जिल्ह्याने या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद पुरस्कार जिंकले. या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत बेस्ट ऍथलेट (पुरुष) चे मानकरी हिंगोली येथील पोलीस अंमलदार सहदेव जाधव तर बेस्ट ऍथलेट (महिला) शिल्पा राठोड पूजा नवले दोन्ही नांदेड बेस्ट अथलेट यांना रेसिंग सायकल बक्षीस म्हणून भेट देण्यात आल्या.

या समारोप कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र चे पोलीस उपमहा निरीक्षक निसार तांबोळी, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक यम. राकेश कलासागर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार निलावार यांनी केले तर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी उपस्थित आमचे आभार मानले.

Related posts

प्रत्येक तालुक्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लावा – जिल्हाधिकारी

Gajanan Jogdand

कोंबिंग ऑपरेशन : एकूण 45 इसमांना पकडून न्यायालयात केले हजर

Santosh Awchar

गुरुपौर्णिमा : सिद्धनाथ महादेव मठ येथे भाविकांची मांदियाळी

Gajanan Jogdand

Leave a Comment