मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली :- वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पूरग्रस्त जनतेच्या सेवेसाठी शिवसेना युवती हिंगोली जिल्हा प्रमुख डॉ. रेणुका गजानन पतंगे यांच्याकडून पूर परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात 8 जुलै रोजी अतिवृष्टी होऊन ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले होते. कुरुंदा व परिसरातील काही गावे पाण्याखाली जाऊन संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले आहेत अनेक कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही समाज सेवेत संस्थांकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यातून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. शिवसेना पक्ष हा नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतो. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा पक्षाचा घालून दिलेल्या नियमानुसार पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतात.
या पूर परिस्थिती चे भान राखत युवासेना युवती हिंगोली जिल्हा प्रमुख डॉ. रेणुका गजानन पतंगे यांच्याकडून पूर परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व 18 जुलै रोजी रक्ततपासणी 50% मध्ये करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांचे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. युवासेना युवती जिल्हाप्रमुख डॉ. रेणुका गजानन पतंगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाभरातील शिवसैनिक व नागरिकांतून कौतुक केले जात आहे.