मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा नागनाथ येथे तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत लोकसंचलीत साधन केंद्र औंढा नागनाथ व महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित महिला बचतगट वार्षिक सर्वसाधारण सभा व मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार संतोष (दादा) बांगर म्हणाले की महिला बचतगटा साठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी तसेच बँकांनी बचतगटा ना कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच आमदार म्हणून नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून सदैव तूमच्यासोबत आहे. तसेच तुम्हाला कधीही काहीही अडचण आल्यास मी तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहीन, असा विश्वास उपस्थित महिलांना आमदार संतोष (दादा) बांगर यांनी यावेळी दिला.
यावेळी तहसीलदार कानगुले साहेब,तालुका कृषी अधिकारी वाघ, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, अनिल देशमुख, रामजी नागरे, श्रीराम राठी, अनिल देव,दिलीपकुमार राठोड, राहुल दंतवार, प्रा.विष्णु पवार, प्रदीप कनकुटे, मनोज देशमुख, नगरसेविका जयाताई देशमुख, कुंताताई गोबाडे, केशव पवार, विलास जगताप, विलास पंडित,ज्ञानेश्वर जाधव,विश्वनाथ मांडगे, राजू पाटील कर्हाळे,लक्षण पवार,शंकर गंगाधरराव पोले,पंढरी मगर, बालू तेली, माधव गोरे, प्रद्युम्न नागरे,रक्षक गायकवाड,चेतन नागरे, अजिंक्य नागरे,खली बांगर,बालाजी बांगर, गोपाळ बांगर, आशिष मुदिराज, ज्ञानेश्वर बांगर व मोठ्या संख्येने इतर मान्यवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.