मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – सेनगाव येथे सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून या सर्व प्रकाराला आळा घालण्याऐवजी सेनगाव पोलिसांचे हाताची घडी तोंडावर बोट, अशी स्थिती असल्याचे दिसते. या सर्व प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार व अंमलदार यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सेनगाव तालुका अत्यंत मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात सर्व काही अलबेला असून सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याचे दिसते.
सेनगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून आता मटकाही सुरू झाल्याचे सूत्रांकडून समजते. याच्या आहारी गोर-गरीब कुटुंबे आणि महाविद्यालय तसेच शालेय विद्यार्थी जात असून सेनगाव पोलिसांकडून त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
सदरील प्रकरणाकडे सेनगाव पोलिसांकडून डोळेझाक व कानाडोळा केला जात असून पोलिसांच्या या दूर व्यवहाराचे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून संबंधित सेनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार व संबंधित अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.