मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – पोलीस व नागरिक सुसंवाद अधिकाधिक वाढायला पाहिजे नागरिकांच्या अडीअडचणी व समस्यांचे निराकरण ही सहज झाले पाहिजे या दृष्टीने हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून जिल्ह्यात पोलीस विभागाकडून पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे.
सदर उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यात आठवड्यातील प्रत्येक शनिवारी एका गावामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार असे आवश्यक सर्व पोलीस स्टाफ सह जाऊन गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व समस्या इतर कायदेविषयक प्रश्न इत्यादी जाणून घेऊन त्यानुसार आवश्यक ते कायदेशीर मार्गदर्शन व कार्यवाही केल्या जात आहे.
7 जानेवारी रोजी गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत वांजोळी या गावी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व त्यांच्या अधिनस्त पोलीस स्टाफ जाऊन गावातील ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.
यावेळी त्यांना ग्राम सुरक्षा दल, गावातील शेतीचे व इतर किरकोळ वाद या संदर्भाने मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले तर बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील लाख या गावी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला.
त्यात बासंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार व त्यांचे अधिनस्त पोलीस स्टाफ असे लाख या गावात जाऊन नागरिकांसोबत बैठक घेऊन चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले.