मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा व युवक सेवा, संभाजीनगर, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 5 डिसेंबर, 2023 रोजी डॉ. शिवाजीराव देशमुख सभागृह, नगर परिषद, हिंगोली येथे करण्यात आले होते.
युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देणे व त्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा या महोत्सवाचा उद्देश होता.
यासाठी प्रती वर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा दिनांक 01 एप्रिल, 2023 पर्यंत ग्राह्य होती. सहभाग घेणारे जिल्ह्यातील युवक व युवतीसाठी वयोमर्यादा 15 ते 29 वर्ष ठरविण्यात आली होती.
संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले असल्याने या निमित्ताने युवकांना तृणधान्याचे महत्व पटवून देऊन विज्ञानाच्या आधारे तृणधान्य उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना यावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
तसेच तृणधान्य उत्पादन वाढ या संकल्पनेवर विविध प्रदर्शन, युवासाठी रोजगार व व्यवसाय संधी, यशोगाथा, पर्यावरण संरक्षण, भौगोलिक परिस्थितोवर आधारित वाढीसाठी उपाययोजना, समस्यांचे निराकरण, संशोधने, देश-विदेशात तृणधान्य आयात, निर्यात यावावत माहितो, विविध योजनांची माहिती, पाक कला इत्यादीबाबत युवकासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांमार्फत तयार करण्यात आलेले हस्तकला, वस्व उद्योग, अॅग्रो प्रोडक्ट इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले.
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांच्या शुभहस्ते करण्यात आले,युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकारामध्ये समुह लोकनृत्य (सहभागी संख्या दहा.) मध्ये हिंगोली येथील नटरंग डॉन्स ग्रुप प्रथम, रुद्राक्ष डान्स ग्रुप व्दितीय व सति मणकर्णिका विद्या मंदिर, हिंगणी हे तृतीय बक्षीस मिळविले आहेत. त्यांना अनुक्रमे 7 हजार रुपये, बक्षिस 5 हजार रुपये, 3 हजार रुपये याप्रमाणे बक्षीसाचे वितरण करण्यात आले.
वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या पाच) यामध्ये इंगळे शिव प्रथम, कदम सोनु व्दितीय, खिल्लारे निकिता तृतीय आले आहेत. त्यांना अनुक्रमे 3 हजार रुपये, 2 हजार रुपये, 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
वैयक्तिक सोलो लोकगीते (सहभाग संख्या पाच) यामध्ये साळवे विनोद प्रथम, गिते सायली दिलीप व्दितीय, मामिलवार अक्षदा बालाजी तृतीय बक्षीस मिळविले आहेत. त्यांना अनुक्रमे 3 हजार रुपये, 2 हजार रुपये व 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
कौशल्य विकास प्रकारात कथा लेखन (सहभाग संख्या तीन) स्पर्धेमध्ये विश्वभूषण फकिरा गायकवाड प्रथम, आयुष गौरव गुप्ता व्दितीय, प्राची ज्ञानेश्वर नागरे तृतीय बक्षीस मिळविले आहेत. त्यांना अनुक्रमे 3 हजार रुपये, 2 हजार रुपये व 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
पोस्टर स्पर्धा (सहभाग संख्या दोन) मध्ये भक्ती कैलासराव गवळी प्रथम, पठाण आरिफा खान व्दितीय, सुरेखा उद्धव जमदाडे तृतीय बक्षीस मिळविले आहेत. त्यांना अनुक्रमे 3 हजार रुपये, 2 हजार रुपये व 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या दोन) मध्ये फकिरा गायकवाड प्रथम, क्षितीजा अशोक वडकुते व्दितीय, आयुष गौरव गुप्ता तृतीय बक्षीस मिळविले आहे. त्यांना अनुक्रमे 3 हजार रुपये, 2 हजार रुपये व 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
फोटो ग्राफी (सहभाग संख्या दोन) विनोद गुलाबराव साळवे प्रथम, बुद्धीप्रिय माधव कांबळे व्दितीय, विश्वभूषण फकिरा गायकवाड तृतीय बक्षीस मिळविले आहे. त्यांना अनुक्रमे 3 हजार रुपये, 2 हजार रुपये व 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसाचे वितरण करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत शुभांगी रामेश्वर इंगळे प्रथम, स्नेहा विजयकुमार इंगोले व्दितीय, सुरेखा उद्भव जमदाडे तृतीय ठरले आहेत.
अशा प्रकारे मोठ्या उत्साहात जिल्हास्तर युवा महोत्सव पार पडले, जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये प्रथम आलेल्या विजेत्यांना पुढील विभागीय युवा महोत्सवात सहभाग नोंदविता येईल.या युवा महोत्सवाचा समारोप शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार्थी डॉ. बंकट यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या युवा महोत्सावात परिक्षक तथा तज्ञ व्यक्ती म्हणून सतिष वाढवे, प्रा. सुधीर वाघ, प्रा. शिवराज तरकसे, प्रा. दिगंबर घुगे, डॉ.किशोर इंगोले, एल.डी. गलांडे, ज्योती खंदारे, विद्या पवार, मुरलीधर जायभाये, राजु लोखंडे, आर्या पवार, साक्षी खिल्लारे उपस्थित होते. तर सेवक म्हणून किरण भिसे, अभिषेक पवार, कृष्णा साबळे, नवनाथ पवार, कार्तिक कल्याणकर, पंकज पवार, गजानन आडे, शंकर पोधे, आदी इंगोले यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे आयोजन व नियोजन व्यवस्थितरित्या क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी पार पाडल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी त्यांचे अभिनंदन केले व विजयी स्पर्धकांना पुढील विभागस्तर युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.