मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – येथे विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने 24 ऑक्टोबर रोजी सुराणा नगर खटकाळी परिसर हिंगोली येथे आनंदीगृह वृद्धाश्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रात शिक्षण, पर्यावरण, प्रदूषण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रात काम करणारी संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली येथे कार्यरत आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ज्येष्ठांसाठी एकही वृद्धाश्रम नव्हते जिल्हा वाशीयांना यासाठी पर्याय हा परभणी होता.
हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर हिंगोली येथील सुराणा नगर खटकाळी परिसर येथे आनंदीगृह वृद्धाश्रम वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहे. आनंदीगृह वृद्धाश्रमाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित जेष्ठ महिला तानाबाई नामदेव अवचार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गजानन जोगदंड, सचिव संतोष अवचार, उपाध्यक्ष विमल जोगदंड, कोषाध्यक्ष अनिता अवचार, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख हिंगोली रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सुशीलाताई राजू आठवले, शिक्षक ज्ञानेश्वर पारवे व संस्थेचे सदस्य गजानन गायकवाड, ज्योती अवचार, दत्ता अवचार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिकांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की, तुमच्या घरी जर वृद्ध असतील आणि त्यांची काळजी घेणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही संस्थेच्या माध्यमातून अशा व्यक्तींसाठी मोफत राहणे, जेवण तसेच सर्व सोयी – सुविधा उपलब्ध करून देणार आहोत, असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
यासाठी संस्थेचे सचिव संतोष अवचार (मो. नं. 9881761177, 9284261561) तसेच संस्थेचे अध्यक्ष गजानन जोगदंड (मो. नं. 8421002224) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.