हिंगोली : संतोष अवचार
येथील जिल्हा समादेशक कक्षाचे 3 जुलै रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड हिंगोली येथे पुरुष होमगार्ड चे उजळणी प्रशिक्षण शिबीर क्रमांक 3/6 दि. 1 ते 8 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे हजर असून त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे महासमादेशक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या पुढाकारातून मुंबई येथून एचडीएफसी बँकेचे कर्मचाऱ्यांची टीम येऊन हिंगोली जिल्ह्यातील सर्व पुरुष व महिला होमगार्डचे बँक खाते बँकेमध्ये उघडण्यास सुरुवात केली. तसेच आतापर्यंत एचडीएफसी बँकेत 646 होमगार्ड पैकी 450 ते 500 खाते उघडले असून उर्वरित होमगार्डचे खाते उघडणे चालू आहे. एचडीएफसी बँकेच्या वतीने महिला व पुरुष होमगार्ड यांना विविध प्रकारचे विमा कवच व होमगार्डच्या मागणीप्रमाणे विविध सुविधा देण्यात आल्या.एचडीएफसी बँकेकडून पुरुष व महिला होमगार्ड यांना देण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भात सर्व होमगार्ड मध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच दिलेल्या सुविधामुळे जिल्ह्यातील सर्व होमगार्ड यांनी महासमादेशक व जिल्हा समादेशक यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्र नायक नानासाहेब मोखडे , प्रशासकीय अधिकारी रमेश वडगावकर , प्रमुख लिपिक हरीश आंबेकर ,समादेशक अधिकारी सुदर्शन हलवाई , ज्येष्ठ कंपनी कमांडर संजय वसिया हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मुनेश्वर यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्र नायक नानासाहेब मोखडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी मानसेवी वरिष्ठ फलटण नायक हरिशंकर जोशी, फलटण नायक अनिल इंगोले शंकर कंठे ,भागवत देवरसे,विष्णु भगवान चव्हाण,वामन मगर, तसेच सैनिक अशोक कुरील , सुभाष भुरे , शेख खाजा यांनी परिश्रम घेतले.