मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – भारत देशात ज्या जाती आरक्षणापासून वंचित राहिल्या आहेत त्यांच्यासाठी इतर राज्यांच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाचे वर्गीकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन व्याख्याते केशव शेकापूरकर यांनी हिंगोली येथे आयोजित आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे स्मृती साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाले अंतर्गत केले.
हिंगोली शहरातील स्व.शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे स्मृती साहित्य सम्राट डॉ. आण्णाभाऊ साठे व्याख्यानमाले अंतर्गत स्व. सुमनबाई लांडगे व स्व. यमाजी लांडगे विचार मंचावर व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात ‘अनुसूचित जातीचे वर्गीकरण वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर प्रमुख व्याख्याते केशव शेकापूरकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे महासचिव राजकुमार नामवाड तर या कार्यक्रमाचे उद्घाटक भारत कलवले (नांदेड) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून हिंगोली जिल्ह्याचे माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लसाकम चे जिल्हा सचिव आत्माराम गायकवाड यांनी केले.
अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जाती आहेत ते 59 जाती पैकी आरक्षणाचा लाभ आत्तापर्यंत ज्या जातींनी घेतला त्यामुळे त्यांचा विकास झाला. परंतु ज्या जाती आरक्षणापासून वंचित राहिल्या त्यांच्यासाठी इतर राज्यांच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे अशा प्रकारचे मत, कायद्यानुसार असलेल्या संहिता, इत्यादी बाबींचे शेकापूरकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल खंदारे आणि गंगाप्रसाद भिसे यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले. अध्यक्ष समारोपानंतर कार्यक्रमाचे आभार रवींद्र खंदारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रेम कुमार सोनवणे, उपाध्यक्ष हरिभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष कमलाजी मानवतकर, सल्लागार पांडुरंग खिल्लारे, सेवानिवृत्त न्यायाधीश आणि बबनराव खंदारे, कार्याध्यक्ष रामानंद आठवले, सहकार्याध्यक्ष श्रावण मंडलिक, सहसचिव उबाळे, कोषाध्यक्ष सचिन आठवले, सहकोषाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र खंदारे, संघटक म्हणून बबनराव खंदारे, भानुदास खंदारे, राजकुमार जोगदंड, बी. बी. लांडगे, दौलत खरात, आर. के. वैरागड, डी. पी. गायकवाड, पी. व्ही. क्षीरसागर, बी. आर. गाडे, सुदाम गवळी, डॉ. रवी थोरात, नवनाथ शिखरे, सुमित कांबळे, संदीप गायकवाड, हिरामण ढोके यांनी प्रयत्न केले.