Marmik
News

स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

अहमदनगर – वीज क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन विज कर्मचारी संघटनेच्या अधिपत्याखाली कोपरगांव येथे स्थापन करण्यात आलेली स्वतंत्र बहुजन विज कर्मचारी सहकारी पतसंस्थेची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन श्री धनंजय बंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस जालिंदर पांढरे यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या उत्साही वातावरणात नुकतीच कोपरगांव येथे संपन्न झाली.

सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व सभासदांचा संचालक मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.

संस्थेचे सचिव दिनेश राजपूत यांनी संस्थेचा सर्व आढावा सर्वांसमोर मांडला, त्याला सर्वानुमते एकमताने मंजूरी देण्यात आली.संस्थेकडून सभासदांना दहा लाख रुपये पर्यंत कर्ज वाटप केले जाते.

तसेच सभासदांचा अपघाती विमा पॉलिसी देखील दरवर्षी संस्थेकडून काढला जातो, सभासदांना बचतीची सवय होण्यासाठी 10% व्याजदराने रिकारिंग ठेव योजना चालु केली आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून असंख्य सभासद, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला सदस्या उपस्थित होते.

Related posts

सणासुदीत प्रवाशांना दिलासा, खाजगी प्रवासी बस धारकांच्या मनमानीला बसणार चाप

Gajanan Jogdand

जयपुर जिल्हा परिषद शाळेला मिळाला इयत्ता 8 वीचा वर्ग, ग्रामपंचायत, गावकऱ्यांच्या बैठे आंदोलनाला यश

Gajanan Jogdand

मार्मिक महाराष्ट्र समूहाकडून ज्योती दोडगांवकर यांचा सत्कार, पोलीस होण्याचे लहानपणीचे स्वप्न विवाहानंतर प्रत्यक्ष साकारले!

Santosh Awchar

Leave a Comment