मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष आठवले :-
कल्याण – देशातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय सध्यस्थिती अतिशय वेगळ्या वळणावर जात आहे. माणसा माणसांमध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तिरस्कार निर्माण करून लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवून देशांमध्ये कंत्राटीकरण सर्व सरकारी क्षेत्रामध्ये खाजगीकरण जसे की शाळा हॉस्पिटल, मिलिटरी, पोलीस प्रशासकीय विभाग इत्यादी सर्वच ठिकाणी खाजगीकरण करण्यात येत असून संविधानाने दिलेल्या आरक्षण विरोधात सध्याचे सरकार काम करत आहे.
परिणामी देशातील तरुण बेरोजगार होत असून ते अंमली पदार्थाचे सेवन तसेच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. म्हणूनच खाजगीकरणाच्या सरकारी निती विरोधात, तसेच EVM हटाव देश बचाओ आवाज जनतेचा बुलंद करण्यासाठी नुकतीच शिकारपुरी हॉल, दुसरा माला, १ नं. बस स्टॅण्ड समोर, उल्हासनगर जनसभा पार पडली.
या सभेच्या सभेचे अध्यक्ष आनंदा होवाळ हे होते. सभेची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन भिकन जाधव यांनी करुन सभेची सुरुवात करण्यात आली.सभेची प्रस्तावना इंजि गौतम बस्ते सर यांनी केली. मिशन जय भारत मी आतापर्यंत कशाप्रकारे उल्हासनगर मध्ये आपले कार्य केलेले आहे हे सुरुवातीपासून त्यांनी आढावा दिला. सर्वप्रथम 1000 गाड्यांवर हे भारत हा नारा बुलंद करण्यासाठी रेडियम मध्ये लिहिण्यात आला. त्यानंतर विविध विषयांवर महानगरपालिकेमध्ये अर्ज दाखल करून विषयाला हाताळण्यात आले.
सेंट्रल हॉस्पिटलचे आंदोलन दोन आठवडे गेटवर चालवले व हॉस्पिटलच्या सुधारण्यासंदर्भात मेडिकल कॉलेज संदर्भात मागणी केली, नगर महानगरपालिकेने बांधलेले रुग्णालय हे महानगरपालिकेने चालवावं हा जनतेचा आवाज बुलंद करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला, संविधान प्रचार रॅली संविधान कार्यशाळा शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रार्थना स्थळांमध्ये आयोजित करून संविधान संदर्भात जनजागृती केली. आरटीआय अंतर्गत महानगरपालिकेला विषयांवर अर्ज टाकून मिशन जय भारत ने दक्ष भारतीय नागरिकांचा दबाव निर्माण केला. मिशन जय भारत च्या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना जाहीर आव्हान केले.
चरण सिंग ( दशमेश पिता युवा सिख लबाना संघटना) यांनी सध्याच्या परिस्थितीवर उपस्थित सर्वांना जागृत करून मिशन जय भारत च्या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले.
सुनील अहिरे (असंघटित कष्टकरी कामगार संघटना महाराष्ट्र) यांनी ‘असंघटित मजुरांची सद्यस्थिती’ या विषयावर असंघटित क्षेत्र किती मोठा आहे. याची सविस्तर माहिती देऊन सध्या असंघटित कामगारांना संघटित होऊन न्याय हक्कासाठी लढावं लागेल असे आव्हान सुनील अहिरे यांच्याकडून करण्यात आले
अमर जोशी ( सर्वोदय संघटना ) ‘देशाची आर्थिक सद्यस्थिती’ या विषयावर देशाची लूट कशाप्रकारे होते यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन प्रत्येक नागरिकांवर दीड लाख रुपये कर्ज आहे असे जाहीरपणे सांगितले. तसेच देश कर्जबाजारी होत चाललेला आहे. याला वाचवण्यासाठी प्रत्येक दक्ष नागरिकांना एकत्र यावा लागेल असे उपस्थितांना आव्हान केले.
लताताई काकडे (महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ) यांनी ‘अंगणवाडी सेविकांचे शोषण’ या विषयावर ताईंनी उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अंगणवाडीची सुरुवात व अंगणवाडी सेविका कशाप्रकारे कार्यरत आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थित संस्था संघटनांना सपोर्ट करण्याचे आव्हान केले.
निलेश देशमुख ( मी म्हारळकर सामाजिक संस्था ) यांनी ‘आरोग्याचे खाजगीकरण’ या विषयावर सध्याचे आरोग्याची स्थिती खूप भयान आहे. उल्हासनगर मध्ये आठ लाख लोकसंख्या असूनही महानगरपालिका उल्हासनगर वाशियांसाठी एकही हॉस्पिटल स्वतः चालवू शकत नाही. संपूर्ण हॉस्पिटल खाजगीकरणाच्या मार्गावर घेऊन चाललेले आहे.
सेंट्रल हॉस्पिटल मध्ये सुद्धा सोयी सुविधा नागरिकांना मिळत नाही नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे खाजगीकरणाकडे लक्ष केंद्रित करून तीन करोड रुपये देऊन जागा देऊन महानगरपालिकेचे रुग्णालय एका खाजगी मालकाला चालवण्यासाठी महानगरपालिका देत आहे.
आयुक्त म्हणतायेत की महानगरपालिकेकडे पैसा नाही आणि सगळेच पायाभूत सुविधेचे उपक्रम हे खाजगी करत आहेत त्याची माहिती सविस्तर रित्या निलेश देशमुख यांनी उपस्थितांना दिली व मिशन जय भारत च्या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले.
एड. राहुल खैरे ( सिद्धार्थ फाउंडेशन ) यांनी ‘EVM मशीन घोटाळा’ या विषयावर EVM मशीन हटाव देश बचाव हा नारा देऊन आपल्याला जर सुरू असलेलं शोषण रोखायचं असेल, सुरू असलेला भ्रष्टाचार रोखायचा असेल, राजकारणांवर आळा घालायचा असेल तर एम मशीन हटाव हे आंदोलन आपल्याला संघटित होऊन करावा लागेल त्याच बरोबर ई व्ही एम मशीन संदर्भात हे जे आंदोलन देश पातळीवर सुरू आहे. त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी खैरे सरांनी सर्वांना जाहीरपणे आवाहन केले.
अमर पवार (चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते ) यांनी ‘शिक्षणाचे खाजगीकरण’ या विषयावर सरकारी शाळा कशाप्रकारे खाजगी होत चाललेले आहे एका विषयाला जनतेसमोर आणायचं आणि पाठीमागून 62 हजार शाळा खाजगीकरणाच्या मार्गावर घेऊन जायचं हे चुकीचं धोरण आहे हे धोरण रोखलं पाहिजे. शाळा खाजगी नाहीतर सरकारीच असल्या पाहिजे प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळालं पाहिजे. या संदर्भात सविस्तर माहिती देऊन शाळा वाचवण्यासाठी पवार सरांनी जाहीरपणे आव्हान केले.
सामाजिक आर्थिक राजकीय सद्यस्थितीचे विश्लेषण आणि पुढील आंदोलनाची दिशा अध्यक्ष आनंदा होवाळ यांनी अध्यक्षीय भाषणात सभेत ठरवलेल्या विषयांचं विश्लेषण करून आपल्याला कोणत्या प्रकारचा आंदोलन करावा लागेल यासंदर्भात सविस्तर माहिती दिली सरकारी शाळा बंद झाल्या नाही पाहिजे असं वाटत असेल तर आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्ये पाठवावे लागेल.
सरकारी हॉस्पिटल खाजगी होऊ नये यासाठी आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागेल. सदर विषयांवर सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना मिशन जय भारत च्या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन केले तसेच अकरा तारखेला जनजागृती कार्यशाळा दिवसभराची घेण्यात येणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविक इंजि. गौतम बस्ते यांनी तर सूत्रसंचालन नविन गायकवाड यांनी केले. विनायक आठवले ( सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी ) यांनी मीटिंगमध्ये घेण्यात आलेले बारा ठरावांची मंजुरी व त्याचं वाचन करून सभेला आर्थिक श्रमिक सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आठवले यांनी आभार व्यक्त केले.
सभेत झालेल्या ठरावावर सर्वांच्या सह्या घेऊन राष्ट्रगीताने सभा संपन्न झाली. सभेसाठी उपस्थित विविध संस्था संघटना पदाधिकारी मुंबई पनवेल वरून आलेल्या विविध संस्था संघटना पदाधिकारी उपस्थित होते. उल्हासनगर मधील लोकप्रतिनिधी माननीय पप्पू कलानी सर दक्ष भारतीय म्हणून उपस्थित राहून सभेचे सदर विषय समजून घेतले व पुढील सहकार्य करण्यासाठी आश्वासन दिले.
अंगणवाडी सेविका व मदतनीस सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व विषय समजून घेतले व मिशन जय भारतच्या मिशन सोबत येण्याचे जाहीर केले.
उपस्थित मिशन जय भारत प्रतिनिधी मीरा सपकाळे, साक्षी डोळस, शशिकांत दायमा, संतोष अभंगे, भिकन जाधव, राजेश जाधव, विजय हळदे, सुमन मधाळे, नूतन मोटघरे, मंगल जाधव, हर्षल पवार, छाया उमरे, डॉ अलका पवार, सचिन कदम, गौतम गायकवाड, वैशाली कांबळे, स्वाती तोरणे, अश्विनी गायकवाड, पद्मा निकम, राजेंद्र देठे, सुशांत घोगरे, उषा होवाळ, प्रकाश कदम, सविता कदम, नरेश परदेशी, आकाश पवार, आयोजक दक्ष भारतीय नागरिक, बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, उल्हासनगर १, श्रावस्ती युवा सेवा भावी संस्था, बाबा रामदेव सेवा भावी संस्था, गुरु रविदास सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य,
बौद्ध धम्मदीप सेवा संघ अंतर्गत युवा संघ म्हारळ,असंघटित कष्टकरी कामगार संघटना महाराष्ट्र, महामाया असंघटित कामगार संघटना जिल्हा ठाणे,मी म्हारळकर सामाजिक संस्था,महात्मा ज्योतिबा फुले रहिवासी संघ शहाड विभाग,सिध्दार्थ फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा ठाणे,सर्वोदय संघटन, इंडियन्स सोशल मुव्हमेंट, दशमेश पिता युवा सिख लबाना संघटना,संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई रेशनिंग कृती समिती, सोशल युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र सामाजिक संस्था,अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट्र, बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण आदींनी परिश्रम घेतले.
पुढील विषय जय भारतचे मिशन असेच सुरू राहणार आहे. या मिशनमध्ये विविध संस्था संघटनांनी आपला सहभाग दर्शवून खाजगीकरणाच्या सरकारी निधी विरोधात जनतेचा आवाज बुलंद करू.सर्व संस्था संघटना पदाधिकाऱ्यांच्या विशेष सहकार्याने सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.