मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद केले आहे. यावेळी केलेल्या कारवाईत दोघा आरोपींना पकडण्यात आले असून 5 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. तसेच चार लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात होणारे चोरी घरफोडीच्या गुन्हा यांना आळा घालून सदर गुन्हे करणाऱ्या आरोपी व त्यांच्या टोळीस पकडण्यासाठी हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्या तपास पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा घटनास्थळ व परिसराचा तसेच असे गुन्हे करणाऱ्या आरोपींना बाबत गोपनीयरीत्या माहिती घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना बाबत माहिती
घेतली असता आरोपी शुभम उर्फ लाल देवानंद वानखेडे व 22 वर्ष अजीम उर्फ अज्जू अनिस माकोडी उर्फ कुरेशी (वय 22 वर्षे, दोन्ही रा. आमराईपुरा आर्णी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ) यांनी हिंगोली जिल्ह्यात व इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून त्यांना शिताफीने घरफोडी साठी वापरणारे हत्यार व भीती दाखविण्यासाठी एक इयर पिस्टलसह ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केले असता त्यांनी हिंगोली ग्रामीण व हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीत एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून तपासा दरम्यान वरील गुन्ह्यातील सोन्याचे व चांदीचे दागिने एकूण किंमत 3 लाख 45 हजार रुपये व चोरीचे दोन मोटरसायकल एक लाख 40 हजार रुपये असा एकूण 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमूद आरोपींची विचारपूस दरम्यान हिंगोली जिल्हा सह माहूर, तामसा येथे देखील अशाच प्रकारचे चोरी, घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, लिंबाजी वावळे, किशोर सावंत, महादू शिंदे, विशाल खंडागळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.