मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून जेरबंद केले आहे. या टोळीतील पाच आरोपींकडून दहा मोटारसायकली (किंमत अंदाजे 5 लाख 5 हजार रुपयांचा) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करून मोटार सायकल चोरीचे गुणधर्म आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी मोटार सायकल गुन्ह्याच्या घटनास्थळांची व परिसराची वेळोवेळी पाहणी करून गोपनीय बातमीदार व सायबर सेल यांच्या मदतीने माहिती घेतली.
सदरचे गुन्हे आरोपी सागर संतोष रिंडे ( वय 21 वर्ष व्यवसाय मजुरी रा. इंदिरानगर डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा) शुभम गजानन मुळे (वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार शेलगाव पार डोणगाव जिल्हा बुलढाणा), प्रतीक रामेश्वर शेवाळे (वय वर्षे व्यवसाय मजुरी रा. विश्व तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा), करण संतोष अंभोरे (वय 21 वर्षे व्यवसाय मजुरी रा. सिद्धार्थनगर डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा), आनंद रमेश गायकवाड (वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा. श्रीराम मठ डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा) यांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले.
सदरील आरोपींना सीतापीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी हिंगोली जिल्ह्यासह परभणी वाशिम जिल्ह्यातून ही मोटारसायकली चोरी केल्याचे कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपासात नमूद आरोपींकडून विविध कंपन्यांच्या एकूण दहा मोटारसायकली किंमत पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नमूद एकूण दहा मोटारसायकलिन पैकी त्यांनी चार मोटार सायकल चोरीचे गुन्हे हे हिंगोली जिल्हा हद्दीत केले असल्याचे निष्पन्न झाले.
नमूद आरोपींना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले असून आरोपींकडून तपासात अधिक मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, प्रेम चव्हाण, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, अजय प्यारेवाले, इरफान, जावेद शेख यांनी केली.