मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा सह इतर जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीस हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या टोळीच्या ताब्यातून एकूण 17 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.
हिंगोली जिल्ह्यात होणारे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासंदर्भाने जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमले होते.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास माहिती मिळाल्यावर 29 मे रोजी नरसी नामदेव पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्या संदर्भाने संशयित आरोपी नामे योगेश तानाजी शिंदे (रा. सिद्धेश्वर), दशरथ लालसिंग पवार वय 26 वर्ष (रा. पेडगाव) हे असून त्यांनी हिंगोली जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी केल्या आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली.
यावरून दोन्ही संशयित आरोपी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या आरोपींनी मोटार सायकल चोरी केल्याची कबुली. देऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नऊ मोटरसायकल (किंमत सहा लाख रुपये) असा मुद्देमाल जप्त केला.
अधिक विचारपूस केली असता त्यांनी नरसी नामदेव पोलीस ठाणे, वसमत ग्रामीण पोलीस ठाणे, छत्रपती संभाजी नगर हद्दीतील सातारा पोलीस ठाणे परिसरातून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. पाच गुन्हे उघड झाले आहेत.
तसेच कळमनुरी तालुक्यातील पारडी मोड येथील इसम नामे गजानन कामाजी पवार हा चोरीच्या मोटार सायकल बाळगत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमूद आरोपीस ताब्यात घेतले त्यास मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर आरोपीच्या ताब्यातून एकूण आठ मोटरसायकल (किंमत चार लाख 70 हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमूद आरोपीकडून एकूण 17 मोटरसायकल (ज्यांची किंमत दहा लाख 70 हजार रुपये आहे) जप्त करण्यात आल्या. सदर आरोपींकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घेवारे, पोलीस उपनिरीक्षक व्ही. पी. विठूबोने, पोलिस अंमलदार लिंबाजी वावळे, भगवान आडे, गजानन पोकळे, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, गणेश लकुळे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, चापोकॉ प्रशांत वाघमारे यांनी केली.