मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जागतिक महिला दिनानिमित्त हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात भरोसा असेल हिंगोली यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमास जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे महिला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच हिंगोली शहर व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहाजहान लियाकत पठाण हिंगोली शहर, औंढा नागनाथ येथील सुजाता संजय घोंगडे, वसमत तालुक्यातील मुरुवा येथील ज्योत्सना कुमार वारे, उमरा येथील लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे यांचा तर क्रीडा क्षेत्रात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथील नेतल कैलास जोशी, सेनगाव येथील भावना सतीश खाडे, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वनिता अशोकराव दंडमे (रा. काळी पेठ वसमत), आखाडा बाळापूर येथील जयश्री अंभोरे काव्य व शिक्षण क्षेत्रातील आखाडा बाळापूर येथील संध्या रंगारी, रत्नमाला संपत गायकवाड हिंगोली, तसेच प्रशासनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीमंता आठवले, साहेब पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, महिला पोलीस अंमलदार सुनीता शिंदे, हालीमा शेख या महिलांनी त्या – त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात माहे फेब्रुवारी 2023 मधील बैठकीत ठेवण्यात आलेल्या 17 कौटुंबिक तक्रारी अर्जामधील पती व पत्नी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यात काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले होते.
त्यांच्या संसारात वाद सुरू होते, अशा जोडप्यांना योग्य व समर्पक समुपदेशन करून त्यांच्या संसारात निर्माण झालेला दुरावा मिटवून त्यांच्या संसारात गोडवा आणण्यात भरोसा सेल हिंगोली यांनी केलेल्या परिश्रमाला फळ मिळाले आहे. त्यातील काही जोडप्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी उपस्थित त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सदर कार्यक्रम घेण्यामागील भूमिका निषेध करून समाजात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव झालाच पाहिजे. त्यामुळे इतर महिला व मुलींना अशी कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच अशी कामगिरी त्यांनी परत करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात उपस्थित डॉ. राधिका देशमुख व सत्यशीला तांगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पोलीस अंमलदार विजया कुलकर्णी यांनी केले.
प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांनी उपस्थित आमचे आभार मानले.