मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात धान्य चोरी करणारी आंतरराज्य टोळी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीकडून 12 क्विंटल हरभरा 40 क्विंटल सोयाबीन असा एकूण 2 लाख 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 मार्च रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी शिवम प्रभाकर आमाने (रा. सराफा गल्ली आखाडा बाळापूर ता. कळमनुरी) हे त्यांच्या कळमनुरी – आखाडा बाळापूर रोडवरील आमाने ट्रेडर्स कंपनी नावाचे भुसार मालाचे दुकान 21 मार्च 2023 रोजी सायंकाळी बंद करून गेले असता त्याच मध्यरात्री त्यांच्या दुकानाचे शटर तोडून 12 क्विंटल 60 किलो हरभरा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
तसेच याप्रकरणी आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे आखाडा बाळापूर येथे दोन घटना घडल्या होत्या. तसेच कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील कोठारी पाटी येथे देखील अशाच प्रकारची घटना घडली.
सदर घटनेच्या अनुषंगाने विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न निर्माण करण्यात आला होता. पोलिसां पुढे सदर चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान होते. सलग चोरीच्या घटना घडल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी तात्काळ घटनेबाबत माहिती घेऊन आरोपींना तात्काळ पकडण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीनवार यांच्या तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने व गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हे हे आरोपी नामे परमेश्वर उर्फ बाबू रामू गायकवाड (रा. दुथडवाडी ता. हिमायतनगर, जि. नांदेड), शिवमंगल पिता ईश्वरदिन मिश्रा (रा. बेरोजचा, तहसील मंजनपुर, जि. कोसंबी राज्य उत्तर प्रदेश), माधव मसाजी पवार (रा. वायपोहना, पोस्ट तामसा ता. हदगाव, जि. नांदेड), शफातउल्लाह इस्तियाक चौधरी उर्फ इरफान (रा. रुस्तुम भाई ची खोली, सोनाळे गाव ता. भिवंडी, जि. ठाणे मूळ रा. टोला हजीजोत ता. मधुबनी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), शेर मोहम्मद इकबाल खान उर्फ शेख उर्फ शाहरुख (रा. घर क्र. 657, संजय नगर सोसायटी कॉलनी, दिलशाद हॉटेल समोर नोरी हॉटेल जवळ शांतीनगर, भिवंडी जि. ठाणे, मूळ रा. अजमगड, उत्तर प्रदेश) यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
यातील आरोपी परमेश्वर उर्फ बाबू रामू गायकवाड, शिवमंगल पिता ईश्वर दिन मिश्रा व माधव मसाजी पवार हे नांदेड जिल्ह्यात दुथडवाडी, तालुका हिमायतनगर वायपाना तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली.
यावरून त्यांना तेथून ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी आखाडा बाळापूर येथे दोन वेळा व कुरुंदा हद्दीत कोठारी फाटा येथे शटर फोडून तीन धान्य चोरी केल्याची कबुली दिली.
सदर आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यातील 12 क्विंटल 40 किलो हरभरा, 30 किलो सोयाबीन ज्याची किंमत 2 लाख 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नमूद आरोपींनी नांदेड, मुंबई, तेलंगणा मधील निर्मल, आदिलाबाद येथे देखील अशाच प्रकारचे गुन्हे यापूर्वी केलेले आहेत.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस अंमलदार भगवान आडे, राजूसिंग ठाकूर, विठ्ठल काळे, सुमित टाले, आकाश टापरे, रोहित मुदीराज, प्रमोद थोरात व तुषार ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने केली.