सेनगाव : जगन वाढेकर /-
तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथील ग्रामपंचायतीने 13 लाख रुपये उचलले असून सदरील निधी कुठे खर्च केला याबाबत चौकशी करावी, अशी मागणी उपसरपंच किसन कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर ग्रुप ग्रामपंचायत असून येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी नऊ महिन्यांपासून एकही ग्रामसभा घेतलेली नाही. तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना सूचना न देता व विश्वासात न घेता सन 2021 22 मध्ये 15 व्या वित्त आयोगातून मागासवर्गीयांसाठी 35 टक्के निधी कुठे खर्च केला तो दाखवावा तसेच निवडणूक होण्याआधी अधिग्रहीत केलेल्या हातपंपावर किती निधी उचलला, तसेच लाईटवर व कोबीच्या रूग्णांवर एकही रुपया खर्च न करता 2 लाख 76 हजार रुपये उचलले असून जिल्हा परिषदेच्या शाळेवर एकही रुपया खर्च केला नाही. तसेच अंगणवाडी वरही एकही रुपया खर्च झालेला नसून 15 वा वित्त आयोगाच्या तेरा लाख रुपये निधीचे काय झाले व हा निधी कुठे खर्च केला याची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आले आहे. या निवेदनावर उपसरपंच मरीबा कांबळे यांची स्वाक्षरी आहे.
2 comments
आमच्या तों डापुर ग्रामपंचायत च पण बगा लई लूट चालू आहे.
निवेदन पाठवा