Marmik
क्रीडा

तालुका व जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेसाठीऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन 

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली यांच्या वतीने तालुका व जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजित करण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वारंवार विनंतीवरुन तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत तारीख वाढवून देण्यात आली आहे.

या शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे अनिवार्य असल्यामुळे ऐनवेळी ऑफलाईन प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत https://dsohingoli.clicksportsindia.com/auth/login या लिंकवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज वेळेच्या आत सादर करावे.

स्पर्धेला येताना ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेली प्रवेश यादी व खेळाडूचे ओळखपत्र यांची प्रिंट काढून मुख्याध्यापक/प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन ते प्रवेश अर्ज स्पर्धेला सोबत घेऊन यावेत. तरच आपला प्रवेश निश्चित करण्यात येईल. तसेच स्पर्धेच्या एक दिवस अगोदर अतिरिक्त (ॲडीशनल) अर्ज सादर करुन स्पर्धेत सहभाग नोंदवता येईल. याची सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी शिक्षक यांनी नोंद घ्यावी.

या शालेय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Related posts

एकता दौडला नागरिकांचा प्रतिसाद; अतिश चव्हाण, काजल राठोड, पोलीस शिपाई योगेश होडगीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

Santosh Awchar

कौमी एकता क्रिकेट स्पर्धा; कळमनुरी संघ विजयी

Santosh Awchar

हिंगोलीत एकाच तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्ण

Gajanan Jogdand

Leave a Comment