Marmik
Hingoli live

इराणी टोळी जेरबंद ; दोन आरोपींसह 2 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली : संतोष अवचार /-

जिल्ह्यात बनावट माहिती देऊन फसवणूक करून दागिने लुटणारी टोळी मागील दोन वर्षांपासून कार्यरत होती. अखेर या इराणी टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावून दोन आरोपींना अटक केली तसेच दोन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

27 ऑक्टोबर 2020 रोजी कळमकोंडा येथील फिर्यादी महिला हिंगोली येथील गांधी चौक येथे कामानिमित्त उभे असताना त्यांच्याजवळ अनोळखी इसम जाऊन त्यांना आजी पलीकडे चोर आलेले आहेत ते तुझे दागिने काढून देतील असे म्हणून सदर महिलेस बाजूला घेऊन त्यांच्या अंगावरील चांदीचे कडे पाटल्या बनती एक हजार रुपये असा एकूण 25 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल खोटे बोलून घेऊन गेला. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान अन्वय गुन्हा दाखल आहे.

दुसऱ्या घटनेत 13 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जिजामाता नगर येथे फिर्यादी महिला ही घराबाहेर फिरत असताना दोन अनोळखी इसम मोटरसायकलवर येऊन या महिलेजवळ त्यांना काहीही कळू न देता फिर्यादीच्या अंगावरील सात ग्रॅम सोन्याचे हार, एक तोळा दोन ग्रॅम सोन्याची गहू पोत व डोरले किंमत 58 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर तिसऱ्या घटनेत 23 मे दोन 2022 रोजी डॉ. पवार हे हिंगोली कडून खानापूर कडे जात असताना त्यांना सावरखेडा पुलाजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांची गाडी थांबवून हिंगोली येथे खून झाला आहे. तुमच्या जीवाला धोका आहे. तुमच्या हाताच्या बोटातील अंगठ्या काढून खिशात ठेवा असे म्हणून फिर्यादी जवळील दोन अंगठ्या कागदात गुंडाळून फिर्यादीच्या खिशात ठेवल्याचे नसून कागदात दगडे ठेवून फिर्यादी ते 20 ग्रॅम च्या सोन्याच्या दोन अंगठ्या ( किंमत 55 हजार रुपये) रुपयांचा फसवणूक करून घेऊन गेले होते. याबाबत बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशाप्रकारे नागरिकांना बनावट व खोटी माहिती देऊन दागिने पळवून नेणाऱ्या टोळीने गुन्हे केले होते. सदर गुन्हे करणार्‍या टोळी निष्पन्न करून त्यांना पकडण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद तीनही गुन्ह्याचा घटनास्थळ परिसर तसेच त्यांचे वर्णन असे गुन्हे करणारे परिसरातील आरोपींबाबत माहिती घेत असताना सदरचे गुन्हे परळी वैजनाथ येथील इराणी टोळीने केल्या बाबत पुरावा व गोपनीय माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळीवैजनाथ येथून दोन आरोपी नामे हुसेनी जावेद जाफरी (वय 24 वर्षे रा. शिवाजीनगर इराणी गल्ली परळी) सफीर फिरोज खान (वय 30 वर्षे रा. शिवाजीनगर इराणी गल्ली परळी) यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा पैकी बासंबा येथील दोन आरोपी सोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे साथीदार नामे तालेफ हुसेन इराणी (राहणार शिवाजीनगर इराणी गल्ली परळी), मेहमद पंजाबी पूर्ण नाव माहीत नाही (रा. परळीवैजनाथ) यांच्यासह मिळून केल्याचे सांगितले सदरील दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

तपासादरम्यान ताब्यात असलेल्या वरील आरोपींपैकी हुसेनी जावेद जाफरी व तालेफ हुसेन इराणी यांच्या सोबत मिळून हिंगोली शहर पोलीस ठाणे येथील विविध गुन्हे केल्याचे सांगितले. नमूद दोन्ही आरोपींकडून सहा ग्रॅम सोन्याची व सात ग्रॅम सोन्याची असे तेरा ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या (किंमत 55 हजार रुपये), दोन ग्राम सोन्याची गहू पोत व डोरले (68 हजार रुपये), पन्नास तोळे चांदीचे हातातले कडे (किंमत 25 हजार रुपये) असा एकूण एक लाख 38 हजार रुपये दागिने व गुन्ह्यात वापरलेली एक यामा कंपनीचे मोटर सायकल किंमत एक लाख रुपये असे एकूण दोन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक येथील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रपिल्लू, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, राजूसिंग ठाकूर किशोर, सावंत, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.

Related posts

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

Santosh Awchar

13 ऑगस्ट रोजी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलची बैठक

Gajanan Jogdand

हिंगोली लोकसभा मतदार संघात 19 आदर्श मतदान केंद्र, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले अमूल्य मत नोंदवा जिल्हाधिकारी

Santosh Awchar

Leave a Comment