मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – तालुक्यातील सापडगाव शेत शिवारात एका कोरड्या विहिरीत पडून भूकबळीने 52 वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना 22 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे सध्या प्रसिद्ध श्रीखंडोबा यात्रा महोत्सव सुरू आहे. सापडगाव शेत शिवारा लगत लोक कलावंतांचे फळ थाटण्यात आलेले आहेत.
सापडगाव येथील उमेश विठ्ठलराव देशमुख यांच्या शेत गट नंबर 193 मधील पाणी नसलेल्या विहिरीत एक अनोळखी वेडसर कचरा, बिसलरी बॉटल आदी जमा करणाऱ्या पुरुष जातीचे प्रेत आढळून आले.
सदरील इसमाचा विहिरीत पडून भूकबळीने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सदरील प्रकाराने कोळसा यात्रेसह जिल्हा घरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी शेतकरी उमेश विठ्ठलराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुपडे हे करत आहेत.