Marmik
Hingoli live क्रीडा

मुलींना पराटे येण्याबरोबर कराटे येणे महत्त्वाचे – प्रियंका सरनाईक

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-


सेनगाव – तालुक्यातील कोळसा येथील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील विद्यार्थ्यांना 29 जुलै रोजी कराटे यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

सापटगाव येथील कराटे महिला प्रशिक्षक प्रियंका सरनाईक यांनी विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथील मुला- मुलींना कराट्याचे प्रशिक्षण दिले. त्यामध्ये त्यांनी मुलींना आपले स्वतःचे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे विशेष प्रशिक्षण दिले. तसेच मुलींना पराटे येण्याबरोबरच कराटे येणे महत्त्वाचे असल्याचे कराटे महिला प्रशिक्षक प्रियंका सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी प्रियंका सरनाईक व त्यांची आई शारदा सरनाईक यांचा सत्कार केला व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.

यावेळी सापटगावचे तेजराव अवचार, प्रकाश शिंदे, कवी शिवाजी कराळे, पवन शिंदे उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिषेक बेंगाळ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सानप एस.एस. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सरकटे व्ही.एस. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाजगीरे बी. जी.पर्यवेक्षक कसाब पी.पी. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

वाघजाळी येथे शांततेत पार पडला पोळा सण

Gajanan Jogdand

हिंगोली येथे सकल मातंग समाजाची बैठक

Santosh Awchar

व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल देशमुख तर उपाध्यक्ष पदी जगन वाढेकर

Gajanan Jogdand

Leave a Comment