मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात लढा देणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची सेनगाव तालुका कार्यकारिणी जाहीर झाली यावेळी तालुका अध्यक्षपदी जगन वाढेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन तालुका अध्यक्ष जगन वाढेकर यांच्यासह निवड झालेल्या कार्यकारिणीचे जिल्हाभरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
सेनगाव येथे व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची बैठक झाली. व्हाईस ऑफ मीडियाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडाळ, श्याम सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, गजानन वाणी यांच्या अध्यक्षतेखाली सेनगाव तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली.
यावेळी सेनगाव तालुका कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी जगन वाढेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर तालुका उपाध्यक्षपदी भारत शिंदे, ग्रामीण तालुकाध्यक्षपदी प्रकाश पाटील गोरेगावकर, सचिव पदी सतीश घनमोडे सहसचिव देविदास कुंदर्गे, कार्याध्यक्ष दिलीप कावरखे , संघटक बालाआप्पा कोडे, प्रसिद्धीप्रमुख संदीप पाटील, कोषाध्यक्ष भास्कर कायंदे, सल्लागार उमाशंकर माळोदे, सहसल्लागार कयूम शेख, सह संघटक संतोष दिवाने, गजानन खिराडे, सल्लागार वसंत खिलारी, शिवाजी गिरी यांची निवड करण्यात आली आहे.
वरील तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उडाळ व जिल्हा कार्यकारिणी यांच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाणी यांनी मार्गदर्शन केले.
व्हॉइस ऑफ मीडिया सेनगाव तालुका अध्यक्षपदी जगन वाढेकर यांची निवड झाल्याने जगन वाढेकर यांच्यासह निवड झालेल्या नूतन तालुका कार्यकारिणीचे हिंगोली जिल्हा भरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.