मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील जयपूर जिरे ग्रामपंचायत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून गावात स्वच्छता ठेवण्यावर भर दिला जात आहे. तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण पावले ग्रामपंचायत उचलत असून ग्रामपंचायतीने आता निसर्गाकडे एक पाऊल टाकला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून ही ही झाडे जगून वाढविली जाणार असल्याने जयपूर गाव हरित होणार आहे.
सेनगाव तालुक्यातील जयपूर जिरे ग्रामपंचायत नेहमीच नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रम राबवत असते. मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून गावात स्वच्छता ठेवली जात असून ग्रामस्थांनी घरातील कचरा रस्त्यावर व इतरत्र कुठेही टाकू नये म्हणून ग्रामस्थांना डजबिन देण्यात आलेले आहेत. त्यानुसार ओला आणि सुका कचरा एकत्र करून तो गावाबाहेर नेऊन टाकला जातो. त्यामुळे ग्रामपंचायत स्वच्छ झाली असून गावाचा कायापालट झालेला आहे.
ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच अग्रेसर असते. ग्रामपंचायतीकडून याआधीही वृक्षलागवड करण्यात आलेली असून बहुतांश झाडे जगविली जात आहेत. ग्रामस्थ स्वतःहून या झाडांना पाणी घालतात तसेच झाडांची निगा राखतात. परिणामी एकही झाड वाया गेलेले नसून सर्वच झाडे जगलेली आहेत.
हरित ग्रामपंचायती च्या दृष्टीने जयपुर ग्रामपंचायतीने आणखी एक पाऊल उचलले असून मोकळ्या जागेत तसेच गावात अनेक ठिकाणी पुन्हा नवीन वृक्ष लागवड केली जात आहे. मागील काही दिवसांपासून सेनगाव तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला आहे.
या पावसाच्या पाण्याचा सदुपयोग व्हावा तसेच पर्यावरणाचा समतोल राखावा या दृष्टीने ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेऊन गावात विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. ही झाडे जगून ती मोठी केली जाणार असल्याने जयपूर जिरे ग्रामपंचायतीने हरित ग्रामपंचायतीकडे पाऊल टाकले आहे.